कर्मवीर महाविद्यालय मूल राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिर डोनी येथे संपन्न
कर्मवीर महाविद्यालय मूल राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिर डोनी येथे संपन्न
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबीर डोनी येथे संपन्न झाले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ऍड. अनिल वैरागडे,प्रमुख अतिथी डॉ. विजया गेडाम रासेयो चंद्रपूर जिल्हा समन्वयक,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके,प्रा.दिनेश बनकर,प्रा.देवानंद मासिरकर, डॉ.संदीप मांडवगडे,प्रा.गजानन घुमडे, प्रफुल वैद्य,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण उपरे आणि डॉ. जी. एस. आगलावे उपस्थित होते.
प्रा.प्रविण उपरे यांनी प्रास्ताविक भाषण करताना शिबिराचा उद्देश स्पष्ट करून सात दिवसात डोनी गावात शेतकऱ्यांना तसेच वन्यजीवाकरिता शेततळ्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता शेततळे खोलीकरण काम हाती घेण्यात आले आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच गाव दुर्गम भागात असून प्राथमिक सुविधेचा अभाव असूनही स्वयंसेवकांनी संकटावर मात करून शिबीर यशस्वी करून दाखविले.समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ऍड.अनिल वैरागडे डोनी गाव मूल पासून जवळच 15 की.मी.अंतरावर असूनही चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येते गावकऱ्यांची मोठी पायपीट होते.शिबिराच्या निमित्याने ही समस्या सोडविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष ऍड. बाबासाहेब वासाडे यांच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रमुख अतिथी डॉ.विजया गेडाम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करून स्वयंसेवक रासेयोच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकास करू शकतो.तसेच समाजसेवा व राष्ट्रसेवा करण्याची संधी उपलब्ध करून देते. प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांनी स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले.प्रा.दिनेश बनकर यांनी स्वानुभवातून श्रमाची महती स्पष्ट केले. डॉ.जी. एस. आगलावे सरांनी शिबीर संदर्भात मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कु.दामिनी मोहूर्ले तर आभार लखन निकुरे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!