विश्व अग्नीहोत्र दिनानिमीत्त
१२ मार्च या दिवशी विश्व अग्नीहोत्र दिवस आहे. हे विश्व पंचमहाभुतांनी बनलेले आहे. या पंचमहाभुतांमुळे आपले जीवन सुखकर बनले आहे. त्यातीलच एक म्हणजे अग्नी ,अग्नीदेवतेची कृपा आपण कशी प्राप्त करायची, हे आपण पाहुया. अग्नीहोत्राच्या माध्यमातून आपण अग्नीदेवतेची कृपा प्राप्त करु शकतो. अग्नीहोत्र म्हणजे काय?, तर सुर्योदयाच्या व सुर्यास्ताच्या वेळी केली जाणारी ऊपासना म्हणजे अग्नीहोत्र!
१० मिनिटांपेक्षाही कमी कालावधीचा हा अग्नीहोत्र मनुष्याला आयुष्यभराचा लाभ करून देतो.
अग्नीहोत्र म्हणजे कामधेनुच आहे. अग्नीहोत्र करण्यात एक वेळेचे बंधन सोडले, तर अन्य कशाचेच बंधन नाही. अग्नीहोत्र स्त्री पुरूष दोघेही करू शकतात. अग्नी होत्राचे महत्त्व, म्हणजे अग्नीहोत्रातून निर्माण होणारा अग्नी हा रजतमात्मक कणांना विघटन करतो व वायुमंडलाची शुद्धी होते. सातत्याने अग्नीहोत्र केल्याने मानवाच्या देहाभोवती 10 फुट अंतरापर्यंत संरक्षण कवच निर्माण करतो.
अग्नीहोत्रासाठी साहित्य काय लागते, तर गाईच्या शेणाच्या ंगोवऱ्या, पिरामिडच्या आकाराचे तांब्याचे भांडे, अखंड तांदुळ व गाईचे तुप. यांच्या साह्याने अग्नीहोत्र केल्या जातो. तांदुळ आणि तुप यांच्या साहय्याने दोन मंत्र म्हणून आहुती दिली जाते. आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त व धकाधकीचे झाले आहे. अशा परिस्थीतीत मानव जातीच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनीच हा मार्ग सांगीतला आहे. आपण जर अग्नीहोत्राचा मार्ग अवलंबला, तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे.अग्नीहोत्राला ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमवतार म्हटले आहे. किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी अग्नीहोत्र हे प्रभावी माध्यम आहे.
आजच्या काळात अणुयुद्धामुळे जे वातावरण प्रदुषित होत आहे, त्या वातावरणाला शुद्ध करण्याचा एकमेव सोपा मार्ग, म्हणजे अग्नीहोत्र.
ही कृती एक कर्मकांड म्हणून न करता साधना म्हणुन केली, तर त्याचा आपल्याला जास्त लाभ होणार आहे.
आपण अग्नीहोत्र करताना आपली आहुती प्रत्यक्ष अग्नीनारायण ,
सुर्यनारायण व प्रजापती स्वीकार करत आहे, असा भाव ठेवून शरणागत भावाने ही कृती केली, तर त्याचा आपल्याला जास्त लाभ होणार आहे.
ही कृती कशी करायची? तर सकाळी सुर्योदयाच्या वेळी शुचीर्भूत होऊन पूर्व दिशेला तोंड करून तांब्याच्या पिरामिडच्या आकाराच्या भांड्यात शेणाच्या गोवऱ्या कापुराच्या साह्य्याने पेटवुन , हातात अखंड तांदुळ व तुप घेऊन मंत्र म्हणुन त्यात आहुती द्यायची. हिच कृती संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी पण करु शकतो. एकावेळी एकच जण आहुती देऊ शकतो. आहुती देताना म्हणावयाचे मंत्र
सुर्योदयाच्या वेळी म्हणावयाचे मंत्र
,!!सूर्याय स्वाहा,सूर्याय ईदं न मम,
प्रजापतये स्वाहा,प्रजापतय ईदं न मम !!
सूर्यास्ताच्या वेळी म्हणावयाचे मंत्र
!!अग्नये स्वाहा ,अग्नय ईदं न मम ,
प्रजापतये स्वाहा ,प्रजापतये ईदं न मम !!
महाभयंकर अशा अणुयुद्धाच्या प्रदुषणापासुन वाचण्यासाठी पृथ्वीवर असे अग्नीहोत्र किंवा यज्ञ याग होणे अत्यंत आवश्यक आहे. ती समाजासाठी केलेली एक सेवाच आहे. आता जवळच होळी आली आहे. ही होळी आपण एक यज्ञ म्हणुन केल्याने त्यातुन निघणा ऱ्या अग्नीतुन वातावरणची शुद्धी होईल.
आता अंधश्रद्धा निर्मुलनवाले होळी पेटवु नका. पेटवायचीच तर कचऱ्याची पेटवा, असे सांगतात. कारण काय तर वृक्षतोड होते. वर्ष भर इतर कारणांसाठी वृक्षतोड होते, तेव्हा हे लोक चुप बसतात आणि जेव्हा हिंदुंचा सण आला की, हे जागृत होतात. कचऱ्याची होळी पेटवल्यावर त्यातुन निघणा ऱ्या धुरापासुन खरच वातावरणाची शुद्धी होईल काय.जेव्हा ही होळी आपण एक यज्ञ म्हणून पेटवू. ज्यात जसे वड,पिंपळ , आंबा एरंड ,ऊस या पाच वृक्षाच्या काड्या ,गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ,गाईचे तुप टाकुन कापुराच्या साहय्याने ही होळी पटवली व भावपूर्ण प्रार्थना केली. तर हा एक यज्ञच होईल. गावोगावी जर अशीच होळी पेटवली, तर अणुबाम्ब सारख्या प्रदुषित वायुपासुन अखील मानवजातीचे रक्षण होईल. सर्वांनी जर अशी होळी पेटवण्यासाठी पुढाकार घेतला, तर ही एक सामाजिक सेवाच होईल. म्हणून आपल्या हिंदु धर्मात सांगीतलेली प्रत्येक कृती ही मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठीच सांगीतली आहे. म्हणूनच आजपासुन हिंदु धर्मात सांगीतलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणण्याचा प्रयत्न करुया.
सौ.भारती कोंतमवार मुल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!