चिमुर तालूक्यात अवैध गौण खनिज उघड
अधिकाऱ्याची सुचना मिळताच,रोड वर मुरमाची गाडी खाली करून ट्रक फरार
जांभुळघाट येथील घटना
तालुका प्रतिनिधी - ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालुक्यामध्ये मागील ५ वर्षा पासुन अवैध उत्खनन सुरू आहे.याची तक्रार व बातम्या द्वारे वेळो-वेळी खुलासा करण्यात आला परंतु महसुल विभागा कडून कोनतीही मोठी कारवाही करण्यात आली नाही. अवैध उत्खनन करणाऱ्या माफीया याचेकडे लीज नसतानाही उत्खनन दैनंदिन सुरूच असते.त्याचा आज ताजा उदा.पाहायला मिळाला आहे. जांभुळघाट ते मालेवाडा रोडवर अधिकारी येण्याची सुचना मिळताच मुरमाचा ट्रक खाली करून फरार झाला.चिमुर परीसरात मागील काही वर्षा पासुन अवैध उत्खनन माफीया यांचे उत्खनन सुरूच आहे. शंकरपूर - चिमुर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या त्रिकूट संचालकांनी आणि जांभुळघाट येथील लक्ष्मण भानुदास घाडगे नावाच्या व्यवसायीकांनी वैध मुरुम उत्खननाच्या माध्यमातुन अवैध मुरमाचे उत्खनन करून अरबो रूपयांचे गबन केले असताना ,जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर व चिमुर चे तहसिलदार हे प्रशासकिय अधिकारी नसल्यासारखे वागतात ,असेच त्यांच्या कर्तव्याचा गैर फायदा यावरून दिसुन येते.अवैध मुरूमाचे उत्खननाच्या माध्यमातुन शासनाचा अरबो रूपयांचा महसुल बुडविला गेला.जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर आणि चिमुर चे तहसिलदार हे मुरमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या शंकरपूर - चिमुर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या त्रिकूट संचालकांना व जांभुळघाट येथील खासगी व्यवसायीक लक्ष्मण भाणुदास घाडगे यांना बेकायदेशीर पणे असेच नेहमी,अभय देतात,हेच त्यांच्या हलगर्जीपणाच्या भेकड कर्तव्यावरून लक्षात येते.त्यांच्या मालमत्तेची चौकशी होणे गरजेचे आहे.वरिष्ठांनी याकडे आवर्जून लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!