वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रस्तावित जैवविविधता उदयानात लागली भीषण आग
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर येथील शेडेगाव हायवेला लागून असलेल्या कक्ष क्रमांक ३७० मध्ये प्रस्तावित जैवविविधता उदयानाला काल रविवारला दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शार्टसर्किटमुळे आग लागली,यात अनेक वृक्ष जळाले. तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात सन २०१८-२०१९ मध्ये पाच हेक्टर परिसरात उद्यानाची निर्मिती केली होती प्रस्तावित उद्यानाचे बजेट 3 कोटी रुपयांचे होते. त्यापैकी ३० ते ४० लाखांचा निधी खर्च करून या प्रस्तावित उदयानाला तार फेसिंग कम्पाउंड गेट तयार करण्यात आले. मात्र,दोन वर्षात कोरोना आल्याने आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विकास कामे थांबविण्यात आली. त्यामुळे दोन वर्षापासून कोणतेही झाड किंवा उदयानाला लागणारे साहित्य यात आले नाही. आजघडीला उदयानात कुठल्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे उदयान कमी व कुरण जास्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रविवारी दुपारी वीज खांबाचा शार्टसर्किट झाल्यामुळे उदयान परिसरात अचानक आग लागली.या परिसरातील संपूर्ण गवत व काही वृक्षही जळाले याची माहिती वन विभागाला मिळाली त्यांनी अग्निशमन पथकाची मदत घेऊन आग आटोक्यात आणली उद्यानात दोन वर्षा पूर्वी २५० झाडा ची लागवड परिसराच्या एका बाजुने लावण्यात आली होती असे वनविभागाने स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!