मूल चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार
मूल चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार
मूल चंद्रपूर मार्गावर आज पहाटे मूल पासून तीन किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक चितळ जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. आज धूलिवंदनाच्या दिवशी पहाटे नागरिक फिरायला निघाले असता, त्यांना ही घटना आढळून आली. लगेच त्यांनी पर्यावरण मित्र उमेश झिरे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यांनी वन विभागाला ही घटना कळविल्यानंतर, वन विभागाची चमू येऊन मृतक चितळला ताब्यात घेतले. एक ते दीड वर्षाचा हा चितळ असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वन्य जीवाचे वास्तव आहे. भरधाव धावणाऱ्या वाहनामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!