१२ व १३ मार्चला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल जवळील जुनासुर्ला येथे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन
यंदाचे संमेलनाध्यक्ष - साहित्यिक डॉ. मनोहर नरांजे
साहित्यिकांची मांदियाळी: पुस्तक प्रकाशन व परिसंवादांची मेजवानी
चंद्रपूर प्रतिनिधी
झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्या वतीने झाडीबोली साहित्य मंडळ शाखा जुनासुर्लाच्या सौजन्याने गत २८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेले २९ वे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलन दि. १२ व १३ मार्च २०२२ रोजी मा.सा.कन्नमवार साहित्य नगरी ( श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल) जुनासुर्ला ता.मूल, जि.चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक शिक्षक डॉ. मनोहर नरांजे हे राहतील. या संमेलनात मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी जमणार असून अनेक पुस्तकांचे प्रकाशन व परिसंवादांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
साहित्यसंमेलनाचे उदघाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डाॅ.मनोहर नरांजे, मंडळाचे अध्यक्ष डाॅ.हरिश्चंद्र बोरकर, ज्येष्ठ साहित्यिक हिरामन लांजे, डॉ. राजन जयस्वाल, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवयित्री अंजनाबाई खुणे, संतकवी डोमा कापगते, ना.गो.थुटे उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून माजी आ.डाॅ.हेमकृष्ण कापगते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे व प्रमख अतिथी म्हणून घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार, राकेश रत्नावार, विनोद अहिरकर, अखिल गांगरेड्डीवार, राजू मारकवार, वासुदेव समर्थ, राजू गोवर्धन, शलमा कस्तूरे, शिल्पा पेरकिवार, आशा देशमुख, विनायक बुग्गावार, नथ्थू आरेकर, ललिता उपराकार, रिना भोयर, सारिका भूमलवार, मुरलीधर लोडेल्लीवार, डाॅ.सुदर्शन दिवसे, गणपती वडपल्लीवार, जितेंद्र लेनगुरे, उद्धव नारनवरे व सर्व पूर्वाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडेल. झाडीगौरव गीत शाहिर नंदकुमार मसराम हे सादर करतील .तसेच ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ.परशुराम खुणे व ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांची प्रगट मुलाखत घेण्यात येईल. समारोपिय कार्यक्रम दि.१३ मार्च रोजी माजी मंत्री सुधिर मुनगंटीवार, जि.प.अध्यक्षा संध्या गुरनूले, पं.स. सभापती चंदू मारगोनवार, जि.प.सदस्या शितल बांबोळे,मूलच्या माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी उपसभापती अमोल चुदरी, डाॅ.बळवंत भोयर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. झाडीपट्टीतील चारही जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर चंद्रपूर,लक्ष्मण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष रंजित समर्थ यांनी केले आहे.
संमेलनाची ठळक वैशिष्ठे:-
१) संमेलनाचे विविध मांडो :-
झाडीपट्टीतील मान्यवरांच्या स्मृतीप्रित्यर्थ संमेलनात विविध मांडो तयार करण्यात आले आहेत. त्यात ग्रामगीताचार्य तुकाराम दादा, बाबुराव वरघंटे, एकनाथ साळवे, वि.वा.जोशी, अरूणा पवार, विनोद मोरांडे, वा.ना.निगम, आचार्य लक्ष्मणदादादा नारखेडे, टी.टी. जुलमे, क.ब.पेंदे मांडवांचा समावेश आहे.
३) मान्यवरांचे सत्कार:-
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी हिरालाल पेंटर, सुधाकर मार्गोनवार, रामकृष्ण चनकापूरे, कुंजीराम गोंधळे तसेच झाडीपट्टीतील अनेक युवकांचा व कलावंतांचा सत्कार केला जाईल.
३) विविध पुस्तकांचे प्रकाशन- याचवेळी लखनसिंह कटरे यांचे 'गावखारी व कामथ',लक्ष्मण खोब्रागडे यांचे 'यश खेचून आणू दारी', प्रशांत भंडारे यांचे 'कवडसा', शितल कर्णेवार यांचे' मौनाचे अत्तर' संगिता बढे, किरण चौधरी, उज्वला कोल्हे यांचे 'त्रिवेणींचा संगम' प्रिती जगझाप यांचे' बालगीतांचा खजिना', संत डोमा कापगते यांचे 'दिव्यांश भजनावली' आदी पुस्तकांचे प्रकाशन होईल.
४) कार्यक्रमांचे स्वरूप:-
रांगोळी स्पर्धा, पुस्तक पोहा, उदघाटन, झाडीगौरव गीत, प्रस्तावना, दुकोडा, भूमिका, कारभार सोपवना, आदव्याची सुपारी, अनुभव, सत्कार, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, प्रकट मुलाखत, बायांचे गाणे, लोकजागृती कार्यक्रम, झाडीपट्टीची दंडार, झाडी कवी संमेलन, 'आता लिवा कता' 'चला या ना, गावा गाना' ' प्राथमिक शिक्षणात बोलीचा महत्व' हे तीन परिसंवाद व समारोप असे दोन दिवसीय संमेलनातील कार्यक्रमांचे स्वरूप असेल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!