माकोना ते सावरी मार्गाचे डांबरीकरण बांधकाम निकृष्ट दर्जाचे - प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी एक किमी अंतराचे डांबरीकरणं होत असून, सदर काम निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेके,आझाद समाज पार्टी चिमुर तालुका अध्यक्ष जेगदीश मेश्राम यांनी केला आहे.माकोना ते सावरी मार्ग खड्डेमय असून, या मार्गाने अनेक नागरिक जखमी होत असतात. त्यामुळं माकोना ते सावरी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दखल घेत माकोना ते सावरी या रोडचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र सदर चे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रहार सेवक व अन्य नागरिकांच्या लक्षात आल्याने सदर कामाची तात्काळ योग्य ती चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी. व केलेल्या कारवाईची प्रतिलिपी पुरवण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हा परिषद बांधकाम सभापती राजू गायकवाड यांना प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, व आझाद समाज पार्टी चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी तक्रार केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!