संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर च्या नवनियुक्त सदस्यांची ची सभा संपन्न
संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर च्या नवनियुक्त सदस्यांची ची सभा संपन्न
प्रतिनिधी:- कुमुद भोयर मूल
महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याखाली सामाजिक चळवळीचा वारसा जपत राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू ठरलेली संस्था म्हणजे संजीवनी फाऊंडेशन महराष्ट्र राज्य.आज दिनांक २४-०२-२०२२ रोजी चंद्रपुर येथे सरदार पटेल महाविद्यालय मधे संजीवनी फाऊंडेशन महराष्ट्र राज्य (नागपुर विभाग) अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्याची बैठक पार पडली.ह्या बैठकीचा उद्देश्य,आगामी कार्यक्रम नियोजन व संघटनात्मक कामात गती आनने हेतु होय.या बैठकीत विद्यार्थी व युवा वर्ग उपस्थित होते.बैठक ही संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य विस्तार समिती अध्यक्ष श्री. राजेश हजारे यांच्या उपस्थित पार पडली. यात त्यांनी आगामी कार्यक्रम यावर सर्व सदस्य यांना मार्गदर्शन केले.तसेच नागपुर विभागाचे विश्वस्त श्री. शुभम निंबाळकर यांनी संजीवनी फाऊंडेशन सोबत असेच एकनिष्ठ राहून संजीवनी फाऊंडेशन चा विकास व विस्तार करण्याचा सैदेव प्रयत्न करा असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे विस्तार समितीचे उपाध्यक्ष श्री.ईजाज इस्माईल शेख यांनी संजीवनी फाऊंडेशन पासून जुळून त्यांना काय यश मिळालं त्याबद्दल महिती दिली. व सर्वांनी संघटित कार्य करा असे आव्हान केले. या बैठकीत उपस्थित नवीन विद्यार्थी व युवा वर्ग यांनी संजीवनी फाऊंडेशन सोबत जुळुन संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करु अशे विचार व्यक्त केले. यावेळी विश्वजित सुशील नायक, सिध्दांत निमसरकार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!