श्रीहरी बालाजी देवस्थान येथील बालाजी सागरच्या पाळीवर अनाधिकृतरित्या केले पक्के बांधकाम रमेश खेरे सेवादल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली कारवाईची मागणी

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - श्रीहरी बालाजी देवस्थान चिमुर येथील बालाजी सागरच्या पाळीवरील लॉजींग बोडींग, हॉटेल, राहते घर, हॉस्पीटल, मेडीकल, मोबाईल शॉपी, नर्सिंग होम व अन्य दुकान लाईन हि अनाधिकृत असल्याने कुठल्याही दुकानास व राहत्या घरास नगर परिषद चिमुर यांचेकडुन परवानगी दिली जात नाही.नगर परिषद कार्यालयात याबाबत कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी उपलब्ध नाही.व तशी नगर परिषद ला कुठलीही नोंद नाही तरीही नगर परिषद तात्पुरत्या स्वरूपात या दुकानदारांकडुन भोगवटा कर घेत असते. तसेच बालाजी मंदिरही भाडे पावती घेत असतात.असे असतांना व नियमबाहय असतांनाही हे कशा पध्दतीने कर वसुली करीत असतात या संबंधीत अधिकाऱ्यांवर रितसर कायद्याच्या चाकोरीत राहुन कारवाई करावी अशी रमेश खेरे सेवादल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!