परीक्षा जवळ येऊनही बस सेवा बंदच.....



शंकरपुर(जगदीश पेंदाम)

दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्या तरी चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंदच असून त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळवर कसे पोहोचावे असा प्रश्न पडलेला आहे...
चिमूर तालुक्यात शंकरपूर, डोमा, साठगाव,आंबोली, भिसी, जांभुळघाट, नेरी, खांबाळा, खडसंगी, मासळ,मदनापुर, तसेच इतर गावातील विद्यालयात दहावी बारावीच्या परीक्षा 4 मार्च  ला बारावी  तर 15 मार्चला दहावीची परीक्षा होणार असून ह्या वर्षी कोरोनामुळे प्रत्येक शाळेसाठीच परीक्षा केंद्र देण्यात आले असून त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची तिथे परीक्षा होणार आहे परंतु त्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थी परिसरातील ग्रामीण भागातील गावातील असल्यामुळे परीक्षा केंद्रावर त्यांच्या बस अभावी येण्याजाण्याच्या प्रश्न निर्माण झालेला आहे..
चार महिन्यापासून एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा मार्गच सुठलाच नसल्याने ग्रामीण भागातील सामान्य नागरिका सहीत आता विद्यार्थ्यांचे हाल होत असून परीक्षा काळात बस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर जाता येईल त्यामुळेच बस सुरू करण्याची मागणी तालुक्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याकडून करण्यात आलेली आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!