तळोधी बा. वनविभागाची १६ जणांवर वन कायद्यानुसार कारवाई

*तळोधी बा. वनविभागाची १६ जणांवर वन कायद्यानुसार कारवाई*




तळोधी बा.:

          तलोधी वन परिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिटातील संरक्षीत वन कक्ष क्र. ९४ मध्ये आज सकाळी गस्तीवर असताना झाडे तोडून लाकडांची विक्री करण्याकरता सायकल ने लाकडे गुलाबी करणारे सोळा जणांना पकडून त्यांच्यावर अवैधरित्या संरक्षीत वनात प्रवेश करून लाकडे तोडून वाहतूक करून विक्री करणे या प्रकारचे वन गुन्हा अंतर्गत कार्यवाही करुन. त्यांच्या सायकली व कुराड करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
                   *ब्रह्मपुरी वन विभागामध्ये मानव-वन्यजीव संघर्ष साठी अत्यंत संवेदनशील असलेल्या आलेवाही बीटा अंतर्गत येणाऱ्या विशेष म्हणजे आलेवाही व येथील वनरक्षकावर कारवाई झाल्यानंतर हा जंगल परिसर मोकळा रानच झालेला आहे. व तळोधी वनपरिक्षेत्र मध्ये तेरा बेटा मध्ये फक्त सध्या पाच वनरक्षक कार्यरत असल्यामुळे चोरांना या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात लाकूडतोडया करता सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील जंगलात आता अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे. सागवान तस्कर मोठ्या प्रमाणावर या परिसरात सक्रिय झालेले आहेत. रात्र-दिवस त्यांची माणसे या परिसरात सागवन तोडण्यात व्यस्त झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचे वास्तव असलेल्या परिसरात लवकरच मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. व मनुष्यबळ कमी असल्याने तळोधी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांंना फक्त हतबल होऊन हे पहावे लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ गंभीर्याने लक्ष देऊन चंद्रपूर जिल्ह्यामधील अत्यंत संवेदनशील असलेल्या या तळोधी बा. वनपरिक्षेत्रात रिक्त झालेल्या जागा भरून काढणे अत्यंत गरजेचे आहे.*
               
     जंगलामध्ये वाघ, अस्वल , बिबट्या, सारख्या प्राण्यांचे वास्तव असतानासुद्धा व या परिसरात सतत वन्यजीवांचे हल्ले होत असताना, व मनुष्य हानी होत असुन सुद्धा . व वन विभागामार्फत तसे फलक लावून परिसरातील लोकांना मार्गदर्शन करून सुद्धा अवैधरित्या अंधारात पहाटेच्या वेळेस जंगलामध्ये प्रवेश करून झाडे तोडून त्यांची लाकडे परिसरामध्ये विकणारी टोळी आज पहाटेला संरक्षित वनात गस्तीवर असलेल्या वनरक्षक श्री एस. बी. पेंदाम यांना मिळाली. तेव्हा त्यांनी तात्काळ जंगलात मिळालेल्या सर्व सोळा (१६) लोकांना पकडून त्यांच्या सायकली व लाकूड तोडायच्या कुल्हाडी जप्त केले व सर्वांवर वन गुन्हा नोंदविला.              
    ही कार्यवाही तळोधी बा.वनपरिक्षेत्र अधिकारी श्री के.आर. धोंडने यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक श्री के.डी. गरमळे यांच्या उपस्थितीत ,आलेवाहीचा कार्यभार असलेले वनरक्षक श्री एस. बी. पेंदाम यांनी केली. यावेळी वनविभागाचे चालक दिपक बारसागडे, चौकीदार श्री देवेंद्र ऊईके, वनमजूर श्री पेंदाम, रामदिन, सचिन रामटेके यांच्या उपस्थितीत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!