तुम्ही सावित्रीच्या लेकी आजच्या आव्हानांना सामोरे जायला स्वतःला समर्थ ,बळकट बनवा!" -डी.आर.शेंडे साहेब ठाणेदार(तळोधी(बा)





तळोधी(बा)
         दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन 1960 द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा)येथे कोविड19 च्या नियमांचे पालन करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यालयात सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 
श्री.खोजराजजी मरस्कोल्हे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर,तथा माजी विद्यार्थी लोकविद्यालय तळोधी(बा), प्रमुख अतिथी डी. आर.शेंडे साहेब ठाणेदार तळोधी(बा), ए.एस.साखरे साहेब PSI ,सौ.रंजनताई पेंदाम पंचायत समिती सदस्या,डॉ.मंडल सर, श्री.आर.बि. विधाते मुख्याध्यापक लोकविद्यालय तळोधी(बा),जेष्ठ शिक्षक पि.यु.गिरडकर,शिक्षक प्रतिनिधी संतोष नन्नावार,पि.बी.पाकमोडे,ए.एन.कोहळे,  आर.एम.निनावे,आर.डी. हांडेकर,एम.व्ही.टोंगे, एस.व्ही.घोडे,अजय सगळाम,संगीता बालमवार, कविता नागपुरकर,सोनल उंबरकर,ज्योती मोहूर्ले,स्नेहा भरडकर,इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्याने अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य खोजराजजी मरस्कोल्हे यांनी मार्गदर्शनात सांगितले की,  देशात लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाची सुरुवात करण्यात आली. राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरित पालकांच्या मुलींना अखंडित शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणांची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजवणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे,तसेच महिला सबलीकरण इत्यादी बाबत सांगितले.


     प्रमुख अतिथी डी.आर.शेंडे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन तळोधी(बा) यांनी स्त्रियांच्या बालिकांच्या आजच्या समस्या मांडून "तुम्ही सावित्रीच्या लेकी आजच्या आव्हानांना सामोरे जायला स्वतःला समर्थ ,बळकट बनवा!" असा संदेश दिला.
   श्री.ए.एस.साखरे साहेब PSI पो.स्टे तळोधी(बा) यांनी  सायबर सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे कारण आपला संवेदनशील डेटा, वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती, संरक्षित आरोग्य माहिती, वैयक्तिक माहिती, बौद्धिक मालमत्ता आणि डेटा चोरीचे संरक्षण करणे आणि सायबर गुन्हेगारांपासून डेटाचे संरक्षण करणे हे एक सराव आणि तंत्र आहे.
   सायबर क्राइम हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये संगणक आणि नेटवर्कचा समावेश आहे. संगणकीय गुन्हे, माहिती चोरी करणे, माहिती पुसून टाकणे, माहिती हाताळणे, दुसर्‍यास माहिती देणे किंवा संगणक भाग चोरी करणे किंवा नष्ट करणे यासारखे अनेक उद्दिष्ट सायबर अपराधाचे आहेत असे मार्गदर्शनात सांगितले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग.9अ) ची विद्यार्थीनी कु.सानिया रवी मोहूर्ले,प्रस्तावित मोसमी कोहळे व आभार  वर्ग 6 अ) ची विद्यार्थीनी कु.भैरवी घनश्याम बोरकर हिने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!