आयत्या बिळात दरेकर नागोबा

आयत्या बिळात दरेकर नागोबा


विद्यमान स्थितीत बोटावर मोजण्याइतकेच प्रामाणिक राजकारणी राज्याच्या राजकारणात असतील.  जवळपास सगळ्यांनीच राजकारणाला धंदा बनविला आहे नोटा छपायची मशीन म्हणून राजकारणाकडे पहिल्या जात आहे.  ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत प्रसिद्धी व सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही.
मोठमोठ्या पत्रकार परिषदा गाजविणाऱ्या व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या बाबतीत हा प्रकार नुकताच उघडकीस आला.  अलिशान व करोडो रुपयांच्या महागड्या गाडीत फिरणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँकेच्या निवडणुकीत शपथपत्रात "मंजूर" असल्याचे नमूद केले आहे. दरेकर यांचा हा प्रताप संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय झाला आहे.  विरोधी पक्षनेते आकांत-तांडव करीत आहे आम आदमी पक्षाच्या राज्य सचिवाने तक्रार करून हा प्रकार उघडकीस आणला.  प्रवीण दरेकर यांच्या या प्रकाराची सर्वत्र "छि-तू"  होत असतानाच "कबूल" आहे असा शब्द त्यांच्या तोंडून निघत नाही. कबूल करायला तयार नाहीत. पक्ष कोणताही असो राजकारणी कोणत्या लेवल पर्यंत पोहोचले आहेत, हे दिसत आहे.
प्रवीण दरेकर 1997 पासून प्रतिज्ञा मजूर संस्थेचे सदस्य आहे.  दरेकर मजूर होऊ शकत नाही असा आक्षेप घेत आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी तक्रार केली. अपात्र घोषित घोषित करण्यात यावे अशी मागणी केली.  सहकारी संस्था निबंधक यांचेकडे ही मागणी करण्यात आली आहे.  तपासणीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संस्थेने केलेल्या कामाचा तसेच तेथील मजुरांचा व त्यांनी केलेल्या मजूरीचा तपशील तपासण्यात येणार आहे. एकूणच या सगळ्यांची चौकशी होईल.  सत्यता बाहेर येईल. पण प्रवीण दरेकरांच्या या प्रकाराने राज्याचे राजकारणी खुर्चीसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे स्पष्ट झाले.
दरेकर दूध पिणारे "बाळ" नाही.  राज्याचे जबाबदार राजकारणी आहेत. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असताना, त्यांचा भूतकाळ असा काळवंडलेला असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही. स्वत:हून कबूल करायला हवे. 
दरेकर यांच्या मजूर या विषयाचा विरोधक समाचार घेत आहेत, पण ते टस-मस होताना दिसत नाही.  चोराच्या उलट्या बोंबा हा प्रकार सुद्धा दिसून येत आहे.  दरेकर यांच्या या प्रकाराची चौकशी व्हावी व कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे बडबडे मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सगळीकडून टीकेचा भडीमार होत असताना प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या प्रकाराला "कुंभाड" असे नाव दिले आहे.  किव  येते प्रवीण दरेकर यांच्या बुद्धीची! कबूल तर नाहीच,  चुकले असताना पुन्हा दुसऱ्यावर दोषारोपण करताना थोडीशी सुद्धा "लाज" वाटत नाही.  काही पत्रकार, सरकारी अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांनी मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे असे ते म्हणतात. त्यांच्या मते त्यांना कोंडीत पकडणारे रिकामटेकडे आहे. हे प्रकरण न्यायालयात नेऊन दाद मागणार आहेत. तेथे कोणता उजेड पाडून दाद मागणार आहेत माहीत नाही.
दरेकर यांच्या या मजूर असण्याचा विषय संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा ठरला आहे. सत्ताधारी असो वा विरोधक या विषयाची सगळे चवीने चर्चा करीत आहे. प्रतिज्ञा मजूर संस्थेचे सर्व कागदपत्र उघड करून दरेकरांनी या प्रकरणावर पडदा पडायला हवा किंवा "कबुल है" असे म्हणायला पाहिजे पण "आयत्या बिळात" शिरायची सवय झालेल्या दरेकर यांसारख्या नागोबा कडून हे शक्य नाही.

प्रा. किशोर बुरबुरे 
एटापल्ली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!