शंकरपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका गायब

शंकरपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका गायब

शंकरपुर (जगदीश पेंदाम) 
 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरे लाटेची परिस्थिती निर्माण झाली त्या त्याकरता सोमवार बाजार बंद करण्यात आले,असून आरोग्य विभागाकडून जनतेला सूचना देण्यात आल्या मात्र अशा स्थितीत गोरगरीब जनसामान्यांचे रुग्ण उपचाराचे आधार स्थान म्हणजे सरकारी दवाखानावर खूप अपेक्षा घेऊन विश्वासाने रुग्ण या सरकारी आरोग्य केंद्रात येतात.. गोरगरीब रुग्ण, कधी हातचे काम टाकून तर कधी मोलमजुरी करून प्रा. आ. केंद्र येथे उपचारासाठी येतात परंतु येथील आरोग्य सेविकाच  नसेल तर रुग्णांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे..
शंकरपूर हे गाव राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचे असून या ठिकाणी आरोग्य सेविका मागील एक महिन्यापासून गायब झालेली आहे या आरोग्य सेविकडे गरोदर माता, बाल संगोपन, बिपी शुगर तपासणी, इतर कामे त्यांच्या कडून केली जातात स्थानिक शंकरपूर मधील आरोग्य सेविकाच नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत, अगोदरच कमी कर्मचारी असल्यामुळे उपचार लवकर व्हावा म्हणून वेळेच्या आधी येऊन परिसरातील ग्रामीण रुग्ण दवाखान्यात येत असतात  शंकरपुर येथील आरोग्य सेविका 16 डिसेंबरला सुट्टीचा अर्ज दोन दिवसाची सुट्टी टाकून दिल्यानंतर त्या उपस्थित झाले नाही त्यामुळे महिला रुग्णांचे विशेष करून माता गरोदर यांचे हाल होत आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभिरतेने लक्ष वेधण्याची विनंती केली आहे,आणि संबंधित आरोग्य सेविका कर्मचाऱ्यावर योग्य कारवाही व्हावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून करण्यात आली आहे...

संबंधित आरोग्य सेविका यांनी माझ्याकडे दोन दिवशीची रजा सुट्टीचा अर्ज दिला असून आजच्या तारखेपर्यंत ड्युटीवर हजर झाल्या नसल्यामुळे या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे....
वैद्यकीय अधिकारी शंकरपुर.. वाकडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!