आदिवासींनी अन्यायाविरोधात तक्रार करणे भोवले - वनविभागानी रोजगार हिरावला
आदिवासींनी अन्यायाविरोधात तक्रार करणे भोवले
वनविभागानी रोजगार हिरावला
मूल (प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या डोणी येथील भारत कोवे यांचे वाघातील हल्यात झालेल्या मृत्यूला वेगळे वळण देवू पाहणार्या वनविभागाचे प्रयत्न गावकर्यांनी उजेडात आणून हाणून पाडले. चिडलेल्या वन विभागाच्या अधिकार्यांनी डोणी-फुलझरी गावातील युवकांना बेकायदेशीर ताब्यात घेवून, बेदम मारहाण केली. या गंभीर घटनेची तक्रार केल्याचा आकस ठेवून वनविभागाने डोणी-फुलझरी गावातील गावकÚयांचा रोजगारच बंद केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
अन्यायाविरोधात दाद मागणे हे प्रत्येकांचाच अधिकार आहे. मात्र इंग्रज मानसिकता असलेल्या वनविभागाला मात्र हे रूचले नाही. गावकर्यांवर आपली दहशत आणि दादागीरी कायम ठेवण्यांसाठी फुलझरी-डोणीच्या जंगलात सुरू असलेल्या बांबू तोडण्यांचे मजूरीचे कामावरून गावकर्यांना बंद केल्याची माहिती आहे. रोजगार हमी योजना आणि कुटीवर असलेल्यांचे देखिल रोजगार हिरावल्याची माहिती आहे.
ताडोबाचे लगतचा भाग बफर झोन करण्यांचेवेळी वनविभागाने गावकर्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बफर क्षेत्रात डिएफओ गुरूप्रसाद रूजू होताच, गावकर्यांना रोजगार तर दिले नाहीच, मात्र हा पारंपारीक रोजगारही कशा पध्दतीने हिरावून घेता येईल या दृष्टीनेच आपली कार्यशैली वापरत असल्याचा आरोप बफर झोन मधील नागरीक करीत आहेत.
त्यातच, चंद्रपूर तालुक्यातील चिचोली आणि मूल तालुक्यातील फुलझरी, डोणी गावातील वनविभागाची ‘दादागीरी’ उजेडात आल्यांने आणि गावकर्यांनी या विरोधात वनविभागाचे विरोधात तक्रारी दाखल केल्यांने चिडलेल्या वनविभागातील अधिकार्यांनी गावकर्यांचा सुरू असलेला रोजगारच हिसकावून घेण्यांचा संतापजनक कृत्य समोर आले आहे.
यासंदर्भात आमचे प्रतिनिधीने वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नाहगमकर यांचेशी संपर्क साधला असता, ‘निधी आला कि, लगेच काम सुरू करू. डोणी आणि फुलझरी क्षेत्रात बाहेरचे मजूर नसून तिथे तेच काम करतात’ अशी प्रतिक्रिया दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!