माॅ जीजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी



गुरुदेव सेवा मंडळ मुल तालुका जि चंद्रपुर व गुरुदेव बचत गटाच्या माध्यमातून माॅ जीजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आयोजक नामदेवराव पिदुरकर सर, यांनी आपल्या कौशल्याने महान संतविभुतींचे फोटो, जिजामाता, रमाई, मदर टेरेसा, बहिणाबाई चौधरी झलकारीबाई
ताराबाई शिंदे,अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डाॅ. रखमाबाई राऊत, यांच्याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती, देण्यासाठी श्रीयुत. गणेश मांडवकर, नामदेव पिजदुरकर, सुखदेव चौथाले, विजय लाडेकर, सितकुरा देशमुख, गुरुदेव बोदलकर, चंद्रशेखर पिदुरकर, प्रभा चौथाले, विलास मांडवकर, माणिक पाटेवार, इ. ना आमंत्रित केले, या सर्व वक्त्यानी कार्यकुशलतेने माहिती विषद् केली. विशेष म्हणजे यामध्ये श्री प्रकाशभाऊ व सुनिता सोनुले या मान्यवरांचा जलसंपदा कार्यालातुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ देवुन यथोचित गौरव
करण्यात आला. कार्यक्रमाला बचत गटातील सदस्य शशिकला मांडवकर, पिजदुरकरताई, पिदुरकरताई, मांडवकर ताई, सुलोचना तांगडे,
माधुरी बोदलकर, तांगडेताई, सुनंदा लाडेकर, इ. गुरुदेव सेवा मंडळातील सदस्यांनी सहकार्य
केले.
गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर तर्फे सायंप्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. व भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!