अवकाळी पावसाने नुसकान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुसकान भरपाई देण्यात यावे - प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.१४/०१/२०२२ ला तहसीलदार नागभीड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. अवकाळी पावसाने नुसकान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुसकान भरपाई देण्यात यावी म्हणून दादाजी भुसे कृषी मंत्री म.रा , विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा , जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदने पाठविण्यात आली.सदर अनुषंगाने निवेदनाद्वारे कळविण्यात आले कि नागभीड तालुक्यातील २०२२ या नवीन वर्षीच मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात चना , तूर , गहू , मूग , उडीद , जवस , लाख , लाखोरी या सर्व कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले इतकेच नव्हे तर शेतकरी राजा हवालदिल झाला. शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तहसीलदारांना निवेदनातुन विनंती करण्यात आली लवकरात लवकर झालेल्या पिकांचे नुकसान त्याबाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुसकान भरपाई देण्यात यावी.अन्यथा प्रहार आक्रमक होऊन तहसील कार्यालय नागभीड सामोर नागभीड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू असेही म्हटले गेले.यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक , निलेश डोमडे, प्रमोद सुरपान पप्पूभाऊ देशमुख , अतुल खेडेकर , दिपक मानुसमारे , रोहित कुमंरे , वृषभ खापर्डे , संतोष जिवतोडे , विकी फुलवाणी , अमर गभणे , विजय करुळकर , सोमेश्वर पानसे , चंद्रहास मेश्राम , हेमराज भुरे , यादव , पाथोडे हे सर्व उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!