दुय्यम निबंधक संध्या रामटेके यांच्या बदलीची मागणी खासदार बाळु धानोरकर यांना दस्तलेखक लेखनिकांचे निवेदन

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - वरोरा येथील दुय्यम निबंधक संध्या रामटेके मागील चार महिन्यापूर्वी कार्यालयात रुजू झाल्या असून त्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे येथील ग्राहक व  लेखनिकांना मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी च्या वेळी त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन दस्तलेखक संघटनेने खासदार बाळु भाऊ धानोरकर यांना केली आहे.तक्रारीमध्ये सदर कार्यालयात ग्राहकांकडून शासनाच्या परिपत्रकानुसार प्रति पान पाच रुपये ऐवजी वीस रुपये प्रति पान घेत असल्याने सामान्य माणसाची लूट केल्या जात आहे. तसेच कार्यालयात पिण्याचे पाणी पिण्यास ग्राहकांना व दस्तलेखकाला बंदी घालण्यात आली असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे मनात येईल तेवढे मुद्रांकशुल्क ग्राहकास भरण्यास सांगितले जाते व केव्हाही कार्यालय सोडून बाहेरगावी जात असल्याने तसेच दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत च्या सुमारास फक्त कार्यालयात उपस्थित राहत असल्याने त्यामुळे नंतरच्या काळात येणाऱ्या नागरिकांच्या दस्ताची नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कुटुंबातील वाटणी पत्र साठी बक्षीस पत्र नोंदणीच्या वेळी नियमानुसार चार टक्के मुद्रांक शुल्क ऐवजी पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात असते तसेच  प्रत्येक नोंदणी दस्तऐवज यामध्ये कोणत्याही प्रकारच्या  जाणीवपूर्वक त्रुटी काढून दस्तऐवज नोंदणी प्रलंबित ठेवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे पक्षकार व दस्त लेखकांची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.त्रुटी बाबत विचारले असता संबंधित दुय्यम निबंधक लेखनिकांसोबत उद्धट वागणूक देऊन योग्य उत्तर न सांगितल्याने सदर दस्तऐवज प्रलंबित राहात असल्याचे निवेदनातून सांगितले आहे. अशा या काम न करणाऱ्या महिला दुय्यम निबंधकांची त्वरित वरोरा येथून स्थानांतरण करावे अशा मागणीचे निवेदन खासदार बाळु भाऊ धानोरकर यांना दिले असून खासदार याबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्व दस्त लेखकांची व ग्राहकांचे लक्ष लागले आहेत.दस्तलेखिकांची लेखणी बंद आंदोलन करुन शहरातील सर्वच दस्तलेखक यांनी संबंधित दुय्यम निबंधक यांच्या अडेलधोरणामुळे त्रासून गेल्याने त्यांनी आपले  लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.सर्वच कार्यालय काल पासून बंद ठेवण्यात आले व जोपर्यंत रामटेके यांचे स्थानांतर होणार नाही तोपर्यंत कामकाज करणार नसल्याचे दस्तलेखक संघटनेने आपल्या निवेदनातून सांगितले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुद्धा देण्यात आले. वेळीच दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!