कुणबी समाजाच्या दिनदर्शिकेचे वितरण



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

कुणबी समाज महिला मकरंसंक्रातीच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे समाजाचे दिनदर्शिका वाटप करन्यात आले


अखिल भारतीय कुणबी समाज संघटना तालुका शाखा मूल आणि श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान मुल यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजाच्या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरला आहे. समाजाचे काम, दिशादर्शक, दिनदर्शिकेच्या माध्यमातून कुणबी समाजातील लोकांची सर्वत्र ओळख निर्माण व्हावी, प्रतिष्ठानांची विविध जाहिरात व्हावी , समाजात दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांना तारखेची, शुभ दिनाची आणि आणि सन वारांची माहिती मिळावी या उदात्त हेतूने दरवर्षी समाजाच्या सहकार्यातून दिनदर्शिका हजारोच्या संख्येने छापून सर्वांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येते.
 दिनदर्शिकेच्या वितरण कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!