क्रांति ज्योति सवित्रिबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

चिमूर : - जी,प,पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री बुज व अंगनवाड़ी केंद्र  आणी ग्राम पंचायत कार्यालय सेंद्री बुज आणि मैजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या सयुंक्त विदेमाने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले व बालिका दिवस साजरा  करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना आजच्या दिवसासाठी शिक्षक बनवण्यात आले व हा जयंतीचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच क्रांति ज्योति सावित्रीबाई फूले यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक पारधी , प्रमुख पाहुने मनुन उपस्थित ग्रामसेवक प्रकाश ब्राम्हण , गावातील सरपंच , श्रीपत जी मरघड़े ,  श्रीमती प्रणाली ढवळे नर्स ,  श्रीमती सुनीता अंगनवाड़ी, प्रमिला सावरबांधे अंगनवाड़ी सेविका ,अंगनवाड़ी मदतनीस अंतकला जिभकाटे,सुरेखा नागपुरे,गट आय,सी,आर, पी,श्रीमती,सरिता चोपकर, जयश्री पाउलज़गड़े,आणि  शाळेतील सर्व शिक्षकवृंध गावातील आशा वर्कर श्रीमती वैशाली गरपड़े,ग्राम रोजगार सेवक अमोल भाऊ येटरे, संगनक परिचालक मनोज भाऊ डाहारे व मैजिक बस इंडिया फाउंडेशन चे समुदाय समन्वयक अनिल जांभुरे हे या जयंती निमित प्रमुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमचे अध्यक्ष माननीय पारधी व प्रकाश जी ब्राम्हण ग्रामसेवक साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपिठावर उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व या कार्यक्रमाचे संचालन मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल जांभुरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!