वाढोणा येथे रोजगार हमीच्या कामाला प्रारंभ




तळोधी बा(यश कायरकर) 

    नागभीड तालुक्यातील  वाढोणा येथील ग्रामपंचायतच्या वतीने रोजगार हमी अंतर्गत मामा तलावाच्या खोलीकरण्याचे कामाचे भूमीपूजन शनिवारला करण्यात आले.
वाढोणा ग्रामपंचायत येथे 340  मजूरांनी कामाची मागणी केली असता, सरपंच देवेंद्र गेडाम यांच्या पुढाकारातून रो.ह.यो.च्या  कामाला सुरुवात करण्यात आली. शंभर दिवस हमखास काम  या योजनेअंतर्गत कामाला सुरुवात करण्यात आली.या कामाला पहिल्याच दिवशी 230 मजुरांची उपस्थिती होती.याप्रसंगी सरपंच देवेंद्र गेडाम, पं.स.सदस्य नागभीड श्यामसुंदर पूरकाम, उपसरपंच भगवान बन्सोड,पि.टी.ओ.समीर वाघमारे ग्रा.सदस्य प्रदीप येसनसुरे, डोर्लीकर, वासुदेव मस्के, सुभाष गजभे,ग्रा.पं. सदस्यां मंगला बोरकर, रेश्मा सडमाके, प्रियंका गंजेवार, रोजगार मेट अशोक घोनमोडे, रोजगार सेवक युवराज डेकरवार, राजू बसोड आदी. ग्रा.पं. येथील कर्मचारी व  मजुर यांची  उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!