उश्राळमेंढा येथे अंगणवाडी क्र.2 चे उद्घाटन




तळोधी बा(यश कायरकर ) 
 
 नागभीड तालुक्यातील  उश्राळमेंढा येथे  अंगणवाडी क्र. 2 चे उद्घाटन  जि.प.सदस्य चंद्रपूर नयना गेडाम व प.स सभापती नागभीड प्रफुल खापर्डे  यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
याप्रसंगी उद्घाटन जि.प. नयना  गेडाम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प.स. सभापती  प्रफुल भाऊ खापर्डे,  प्रमुख पाहुणे जि.प.चंद्रपूर  गटनेते  डॉ. सतीश वारजूरकर, जि.प. सदस्य चंद्रपूर   खोजराम  मरस्कोल्हे, गंगासागर हेटी सरपंच  दिलीप  गायकवाड,  येनोली सरपंच अमोल बावनकर,   चिखलगाव  सरपंच सीताराम मडावी, वाढोणा सरपंच देवेंद्र गेडाम, ग्रा. प. उपसरपंच जयेश लोंढे, ग्रा. प.सदस्य प्रभाकर शेंद्रे, आशा बोरकर, शेवंता बोरकर, पोर्मिंमा बोरकर, सविता सयाम,  देवानंद डोर्लीकर,  रामदास तोडासे, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी  कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक  वाय. पी.कापगते यांनी केले तर प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच सेवा जिल्हाध्यक्ष हेमंत लांजेवार, आभार जि.प. शाळा मुख्याध्यापक शिवणकर यांनी मानले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!