महावितरण कार्यालय च्या हलगर्जी मुळे वॉर्ड क्रं. 16, वीहिरगाव, रेतीची तस्करी करणारी बैलबंडी आदळून विजेचा खांब पडन खुप मोठा स्पार्क (विस्फोट)
महावितरण कार्यालय च्या हलगर्जी मुळे वॉर्ड क्रं. 16, वीहिरगाव, मुल रेतीची तस्करी करणारी बैलबंडी आदळून विजेचा खांब पडन खुप मोठा स्पार्क (विस्फोट)
मुल (प्रतिनिधी)
मुल शहरातील विहिरगाव, वॉर्ड क्रं. 16, येथील रस्त्याच्या मधोमध असलेला वीज सिमेंट खंबा महावितरण कार्यालय मुल च्या हलगर्जी मुळे न हटवल्यामुळे रेतीची तस्करी करणारी बैलबंडी आदळून विजेचा खांब पडल्यामुळे खूप मोठा स्पार्क (विस्पोट )झाला. मागील कित्येक महिन्यापासून रस्तावर मधोमध असलेला वीज खंबा हटवा याचे निवेदन आपल्या महावितरण कार्यालय मुल येथे देऊन सुद्धा आपण मधोमध असलेला वीज खंबा हटविले नाही. यामुळे महावितरणच्या हलगर्जी मुळे नागरिकांचा जीव धोक्यात होता तरी सुधा आपण या कडे लक्ष नाही दिल्यामुळे काल दिनांक 17/012021 ला श्री प्रकाश किशन गेडाम यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची गरज भासल्याने त्यांनी बैलबंडी ने रेती तस्करी करणाऱ्या लोकांकडून रेती बोलवली असता, रेती त्यांच्या घराजवळ टाकताच बैलबंडीच नियंत्रण सुटल्याने अचानक बैलबंडी समोर जाऊन दोन उभ्या असलेल्या मोटर सायकल ला धडक मारून रस्त्याच्या मधोमध असलेला वीज खंबा ला धडक मारून वीज खंबा पडला आणि दोन मोटर सायकल चे खूप मोठे नुकसान झाले.
*स्थानिक रहवासी रोज जेवण केल्यानंतर रस्ताने फिरत असतात आणि लहान मुल - मुली खेळत असतात जर अपघात स्थानिक रहवासी फिरत असताना झाले असते तर खूप मोठी जीवित हानी झाली असती तर याचा जिम्मेदार कोण, बैलबंडी ने रेतीची तस्करी करणाऱ्या बैलबंडीचे मालक की महावितरण कार्यालय चे कर्मचारी असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!