जांभुळघाट येथे मोजरी वरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे आगमन
संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दि.६ नोव्हेंबर २०२१ नेहमी दर वर्षी प्रमाणे यंदाही जांभुळघाट येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी मोजरी वरून येत असते.आजच्या दिवशी संपूर्ण गावामध्ये उत्साहाचे माहोल असते.संपूर्ण गावात रस्त्यावर रंग - रांगोळीने,पताके बांधून सजावट करण्यात येत असते पालखी ला आनण्या साठी गावातील गुरूदेव मंडळ व नागरीक हे गावा बाहेरून पालखीला संमानाने,भजन मंडळ सह नाचत-गात आनीत असतात.संपुर्ण गावात पालखीला फिरविली जाते प्रत्येक चौकात पालखी ला संमाणाने पुजा करून राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा आर्शिवाद घेत असतात.त्या नंतर ही पालखी गुरूदेव सेवा मंडळ जांभुळघाट येथे जात असते. गुरूदेव सेवा मंडळ याचे कडून ठरल्या प्रमाने कार्यक्रम होत असतो.व महाप्रसादाचे वाटप झाल्या नंतर सायंकाळी एक पालखी मांगलगाव व दुसरी पालखी मेटेपार मार्गे अड्याळ टेकडी (ब्रम्हपूरी) ला जात असते.अश्या प्रकारे जांभुळघाट येथे मोठ्या प्रमानात उत्साह साजरा केला जातो.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!