अज्ञात इसमाने धानाचे पुंजने जाळले तिघांची पूजने आगीत खाक
अज्ञात इसमाने धानाचे पुंजने जाळले
तिघांची पूजने आगीत खाक
ब्रह्मपुरी तालुक्यातील सोंद्री येथील महादेव दोनाडकर , नक्ट्र विस्तारी कमाने , दिनकर विस्तारी कमाने या शेतकऱ्यांचे पिंपळगाव रोड लगत शेतामध्ये असलेले धानाचे पुंजन्यांना दि.४ नोव्हेंबर ला रात्री 9.30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली . यामध्ये धानाचे पुंजने पुर्णपणे जळून खाक झाले , यात एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव यांनी घटनास्थळी भेट दिली .व नगर परिषद ब्रह्मपुरी येथील अग्निशामक दलाला पाचारण केले . आग आटोक्यात येईपर्यंत ठाणेदार रोशन यादव रात्री 2 वाजतापर्यंत हजर होते . पुढील तपास ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.
एस टी कर्मचाऱ्यानी केली काळी दिवाळी साजरी
कोणत्याही संघटनेत न राहण्याची घेतली शपथ
अनेक दिवसापासून विविध मागण्या साठी एस टी कर्मचाऱ्यानी बेमुदत संप पुकारला आहे. दिवाळी च्या पर्वावर ब्रम्हपुरी आगारातील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबा समवेत काळी फिती लावून पेंडलमध्ये ठिय्या आंदोलन केला.तसेच कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संघटनेत न राहण्याची जाहीर शपथ यावेळी घेतली.
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक
ब्रम्हपुरी- घरी कोणी नसल्याची संधी साधून आरोपी नामे तुळशीदास वामन भोयर वय ३४ रा . आक्सापुर याने गावातील प्रेमदास मारोती पंचभाई यांच्या घरी दिनांक २८ / ९ / २०२१ रोजी प्रवेश करून सोन्याचा ऐवज असा एकूण ५२ , ५००/- रुपयांचा मुद्देमाल चोरी करून गावातून पळून गेला . त्यामुळे सदर चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी विरुद्ध संशय बळावला परंतु ठोस पुराव्यानिशी आरोपीस अटक करण्यात आली नव्हती . पण जेव्हा आरोपी गावात आल्याचे सुगावा लागताच आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली . तेव्हा आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीच्या राहत्या घरातून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीस अटक करून भांदवी कलम ४५४ , ४५७ , ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुमरे करित आहेत .
दिवाळीनिमित्त नवे जावई व लेकीचा सत्कार
बोंडेगाव वाशियांचा अनोखा उपक्रम
दिवाळी आली की अनेक गावात कब्बडी, कुस्ती , संस्कृतीक कार्यक्रम, नाटक आदी चे आयोजन केले जाते.नवी कपडे, फ्टाक्यावी आतिषबाजी ने आनंद दाई वातावरणात हा सण साजरा केला जातो.ब्रम्हपुरी वार्ड क्रमक एक बोंडेगाव येथे अनेक वर्षापासून नवीन जावई व मुलगी यांचा गावकऱ्यांचा वतीने सत्कार करण्याची परंपरा आहे मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मागील दिवाळी साजरी करता आली नव्हती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा पुन्हा नव्या जोमाने आनंदात दिवाळी साजरी करण्यात आली..यानिमित्त बोंडेगावातत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन जावई व गावकरी यांच्यात कबड्डीचा सामना रंगला तर गावातील अनेक नागरिकांचा कोरीना विषाणू ने मृत्यू पावले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर नवीन जावई व नववधू मुली यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. रागोळी स्पर्धेत विजेताना पुरस्कार देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!