लोकविद्यालय तळोधी(बा) येथील माजी विद्यार्थ्यांनी दिला गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात

लोकविद्यालय तळोधी(बा) येथील माजी विद्यार्थ्यांनी दिला गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात 
  तळोधी(बा):
 दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन१९६० द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा) येथे कोविड 19 नियमांचे पालन करून विद्यालयातील होतकरु व गरजु विद्यार्थ्यांना मदत दिली यात विद्यालयासाठी बुक केस,स्पर्धा परीक्षेची पुस्तके व नोटबुक दिली  
     येथील माजी विद्यार्थी श्री.संदीप मेडपल्लीवार अमेरिका यांच्या वतीने  विद्यालयातील गरीब,होतकरु  व गरजु विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेची पुस्तके, बुककेस विद्यालयातील ग्रंथालयासाठी व नोटबुक वाटप करण्याकरिता विद्यालयाला देणगी दिली. विद्यालयातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मदत स्वरूपात नोटबुक संच विद्यार्थ्यांना दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरीचे व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
        या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आर.एस.राऊत  संस्थेच्या व्यवस्थापण समितीचे सचिव , प्रमुख अतिथी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.व्ही. एस. तोंडरे ,ए. आर. नागमोती, ए.एस.राऊत, डी.पी.समर्थ सदस्य दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी,आर.बि. विधाते
उपस्थित होते.
     अध्यक्षीय भाषणात श्री.आर.एस.राऊत यांनी सांगितले की,आमच्या संस्थेअंतर्गत लोकविद्यालय तळोधी(बा) ने आजतागायत अनेक उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअरिंग, यशस्वी जबाबदार नागरिक समाजाला दिलेत.ते आज देशात व विदेशात कार्यरत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त,साधना व नम्रता ठेवण्याचे आव्हान केले.
   कार्यक्रमाचे संचालन सहा.शिक्षक संतोष नन्नावार व  आभार अंबादास कोहळे यांनी मानले.
        सदर कार्यक्रमाला विद्यालयातील जेष्ठ शिक्षक पि. यु.गिरडकर,डी. आर. रेहपाडे, पी.बी. पाकमोडे, सहा.शिक्षक आर. एम. निनावे,आर. डी. हांडेकर, कु.संगीता बालमवार, एम.व्ही. टोंगे,एस. व्ही. घोडे, सोनल उंबरकर,ज्योती मोहूर्ले,स्नेहा भरडकर, अजय सगळाम, एकनाथ भगत, सुरेश कुंभरे, इतर शिक्षक, शिक्षिका,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!