मूल तालुक्यातील उश्राळा येथील बहुसंख्य युवा बांधवाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे गाव तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य युवक चे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
सदर बैठक युवकचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष गौरव शामकुळे व तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार ह्यांच्या प्रयत्नाने मूल तालुक्यातील उश्राळा येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकी मध्ये बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला. पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची कार्यकारणी करण्यात आली.
सदर बैठकीत आदी बहुसंख् युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला.
युवकांनी गावातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू व समोर येणाऱ्या जिल्हापरिषद - पंचायतसमिती निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले.
तसेच गावा- गावात राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा युवकचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष गौरव शामकुळे व तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार ह्यांनी असा सल्ला उपस्थित युवकांना दिला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!