जांभुळघाट येथील नेरी टि पॉईंट वर ट्रॅक्टर (थ्रेसर) मसीन च्या अपघातात १ मजूर गंभीर जखमी

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - दि.२२/१०/२०२१ दुपारी ०४:४५ वा.जांभुळघाट येथील कांपा-चिमुर रोड लगत असलेल्या नेरी - टी पॉईंट वर  ट्रॅक्टर सह (थ्रेसर मसीन) सिंदेवाही कडे जात असताना नेरी कडे वळन घेताना मागे थ्रेशर मशीन वर बसलेल्या मजुराचे तोल गल्याने मजूर हा खाली पडला व थ्रेसर मशीन चे चाक पायावरू गेल्याने त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले.
   लखन संजय गेडाम वय अंदाजे २५ वर्ष मु.सरडपार ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर असे असुन त्यास जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर रितेश उमरे त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून प्रथमोपचार केले व नंतर पुढील उपचारासाठी चिमुर येथील उपजिल्हा रूग्णलयात दाखल करण्यासाठी रूग्ण वाहिनी द्वारे रुग्णाला पाठविण्यात आले.व डॉक्टरांनी मानव सेवा हिच जन सेवा असा संदेश दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!