दिवाळी निमीत्ताने बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे वा शेजाऱ्यांना/पोलिसांना कळवावे - पोलीस निरीक्षक बल्लारपूर

दिवाळी निमीत्ताने बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे वा शेजाऱ्यांना/पोलिसांना कळवावे - पोलीस निरीक्षक बल्लारपूर 

प्रतिनिधि (वसंत मुन) 

बल्लारपूर :- पोलीस स्टेशन बल्लारशा चे वतीने बल्लारशा/बामणी येथील नागरिकांना सूचित करण्यात येते की पुढे होणारे दीपावली  सणा निमित्य ज्या नागरिकांना बाहेर गावी जाणार असल्यास त्यांनी कृपया आपले घरी मौल्यवान वस्तू (सोने,चांदी,हिरे) किंवा पैसे ठेऊ नये तसेच स्वतःचे  घराचे प्रवेश  द्वार मजबूत तसेच कुलूप कडी कोंडा मजबूत लावावा तसेच दरवाज्याचे पुढे किंवा पाठीमागे लोखंडी ग्रील लावावे तसेच बाहेर गावी जाताना आपले घर शेजारी याना माहिती द्यावी तसेच शेजाऱ्यांच्या सतत मोबाईल वर संपर्कात रहावे तसेच आपण बाहेर गावी जाताना आपले घरचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक पोलीस स्टेशन बल्लारशा येथे माहिती दयावी जेणेकरून पोलिसांना गस्त  दरम्यान सदर घरास भेट देऊन पाहणी करता येईल. कृपया वरील सूचनांचे पालन करावे जेणेकरून  मालमत्तेचे रक्षण करता येईल तरी नागरिकांनी या दरम्यान आपल्या मालमत्तेचे रक्षण तर करावेच शिवाय कोणीही संशयित इसम वा वस्तू आढळून आल्यास याची माहिती पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे द्यावी असे आवाहन श्री उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!