चिमूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सनापूर्वी सानुग्रह अनुदान, कर्मचार्यांचे वेतन ग्राम पंचायतीचा वेतनातील हिस्सा, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच नवीन वाढीव वेतन अनुदान अदा करण्यात यावा याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटने तर्फे आमदार बंटी भांगडिया यांना दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सनापूर्वी सानुग्रह अनुदान, कर्मचार्यांचे वेतन ग्राम पंचायतीचा वेतनातील हिस्सा, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच नवीन वाढीव वेतन अनुदान अदा करण्याबाबत चे निवेदन आमदार बंटी भंगडिया यांना देण्यात आले.
संदर्भ क्रमांक.(१) शासन निर्णय क्रमांक व्हिपीएम २६९९/प्रक, २०६ (१) २१ दिनांक. २१/०१/२०००
(२) शासन निर्णय क्रमांक व्हिपीएम २०१२/प्रक. २३५/परा-३ दिनांक ०४/०३/२०१४
(३) उद्योग, उर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्रमांक किवेअ. २०१३/५२/प्रक २७/ कामगार ७ दिनांक ०७/०८/२०१३
(४) शासन निर्णय क्रमांक व्हिपीएम २०१७/प्रक २७ परा-३ दिनांक ०६/०१/२०१८
(५) शासन निर्णय क्रमांक व्हिपीएम २०१९ / प्रक १३२ / परा-३ दिनांक १०/ एप्रिल २०१९
कृपया विनंती आहे कि. चिमूर पंचायत समितीअंतर्गत बऱ्याच ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचे मागित काही महिन्यापासून शासन वेतनाचे अनुदाना व्यतिरिक्त ग्राम पंचायतीची हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्याची रक्कम तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिलेली नाही ग्राम पंचायती सचिव (सर्व) वेतन व इतर लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
अश्या परीस्थित तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी यांना दिवाळीपूर्व सदर थकीत असलेली रक्कम मिळाल्यास त्यांची व त्यांच्या कुटुंबाची दिवाळी साजरी करता येईल. नाहीतर दिवाळी अंधारात जाईल.
तेव्हा विनंती आहे कि ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्व सानुग्रह अनुदान राशी व मागील काही महिन्याचे शासन वेतनाचे अनुदाना व्यतिरिक्त ग्राम पंचायतीची हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्याची रक्कम तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम तक्ताळ अदा करण्यात यावी तसेच नवीन वाढीव वेतन अनुदान अदा करण्यात यावे.या करीता आमदारांनी आपले स्तरावरून प्रयत्न करून ग्रामपंचायत कर्मचारी यांना सहकार्य करण्यात यावे अशी निवेदनाच्या माध्यमातून विनती करण्यात आली.यावेळी आमदार यांच्याशी चर्चा केली असता लवकरच समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!