हिलिंग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक अश्वमेध उर्फ साईनाथ बुटके यांच्यावर चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२९/१०/२०२१ रोजी सायंकाळी ०६:०० वाजताच्या दरम्यान हिलिंग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक अश्वमेध उर्फ साईनाथ बुटके हे काहिही विचारणा न करता डॉक्टर बोरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून बळजबरीने व्हिडिओ शुटिंग करीत होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना विचारणा केली कि कुणाच्या परवानगीने तूम्ही व्हिडिओ शुटिंग करीत आहात.यावर हिलिंग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक अश्वमेध उर्फ साईनाथ बुटके यांनी डॉ.बोरकर यांना अश्लील शिविगाळ करण्यास सुरुवात केली.यावरून डॉ.बोरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वाद झाला आणि त्यानंतर या सर्व प्रकरणाची रितसर चिमूर पोलीस स्टेशन ला डॉ.बोरकर यांनी तक्रार केली. व कलम ४४८,२९४ या अंतर्गत पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी गुन्हा दाखल केला. याविषयी संपूर्ण चिमूर तालुक्यात तथा चिमूर शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!