ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने 'वन्यजीव आणि अंधश्रद्धा' या विषयावर पर्यटक मार्गदर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने 'वन्यजीव आणि अंधश्रद्धा' या विषयावर पर्यटक मार्गदर्शन
यश कायरकर:
          ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने वन्यजीव सप्ताह समारोप प्रसंगी 'वन्यजीव आणि अंधश्रद्धा' या विषयावर पर्यटक मार्गदर्शक, विद्यार्थी,  वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर होते .उपसंचालक (वन्यजीव )नंदकिशोर काळे, सहायक वनसंरक्षक महेश खोरे ,वनपरिक्षेत्राधिकारी एस. के .शेंडे, क्षेत्र सहायक विलास  कोसनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .याप्रसंगी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी अंधश्रद्ध मानसिकतेमुळे विविध दुर्लभ वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते यावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धाशी संबंधित विविध विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनीही यांनीही वन्यजिवांशी  संबंधित अंधश्रद्धांवर जनजागृती होणे महत्त्वाचे असून या महत्त्वपूर्ण कार्याची व्यापकता वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले .सदर कार्यक्रमाला पर्यटक मार्गदर्शक ,विद्यार्थी  वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!