योगी सरकार विरोधात घोषणा देऊन मंडल अधिकारी राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
तळोधी बा.(यश कायरकर)
आज दिनांक ११ आँक्टोबरला महाराष्ट्र बंद च्या आदेशाने तळोधी बा.येथे महाविकास आघाडी शाखा तळोधी च्या वतीने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खैरी येथील शेतकरी आपल्या न्याय मागणी करण्यासाठी आंदोलन करीत असताना उत्तर प्रदेश गृहमंत्री मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून शेतकरी मारल्या गेले.मात्र योगी सरकारने व केंद्र सरकारने आरोपीला हाताशी धरुन संरक्षण दिले.आरोपीवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने तळोधी बंदचा पुकारण्यात आला.या निषेधाविरोधात व्यापारी वर्ग यांनी कडकडीत दुकाने बंद ठेवून निषेध रँली पाठिंबा दर्शविला होता .गावातील मुख्य मार्गाने केंद्र सरकार व योगी सरकार विरोधात घोषणा देऊन मंडल अधिकारी राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी नागभीड पंचायत समीतीचे सभापती प्रफुल खापर्डै,जि.प.सदस्य खोजराम मरसकोल्हे,दिवाकरभाऊ निकुरे,संजय अगडे,उपाध्यक्ष नागभीड तालुका काँग्रेस कमेटी नागभीड,विलास लांजेवार ग्रा.प.सदस्य ,वंसतराव बडवाईक सेवादल कांँग्रेस अध्यक्ष ,वामनराव मदनकर,शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज वाढई,प्रभाकर मारभते,सरपंच जिला अध्यक्ष हेंमत लांजेवार,सरपंच अमोल बावनकर,श्रावण ठोबरे,अमजद शेख,निरज चन्ने,मोनील देशमुख ,राष्ट्रवादी नागभीड तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड ,रघुनाथ बोरकर,मिंलीद अहिरकर ,राजु वानखेडे,मुखरु महाडोळे,महिला शहर अध्यक्ष शालीनी मदनकर,पंचायत समीती सदस्य रंजना पेंदाम,जिल्हा परिषद सदस्य नैना गेडाम व असंख्य महाविकास आघाडीचे बहुसंख्य ने निषेध रँलीत सहभागी होते .यावेळी पोलिस बंदोबस्त कडक होता .व शांतपणे निवेदन देऊन अल्पोहार देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!