जन्मदिवशीच संपविली जीवनयात्रा

वाहानगाव येथील घटना

चार तासानंतर पोहचले शेगाव पोलीस, शेगाव पोलिसांचा बेजबाबदारपणा

प्रेमकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा

नेरी - प्रतिनिधी ( शुभम बारसागडे )

नेरी : - तालुक्यातील खडसंगी जवळील वहानगाव येथील २७ वर्षीय तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच कडूनिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. 
     आज सकाळ साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची गावातील नागरिकांत चर्चा आहे.
       सूरज बंडू कुडके, असे मृत तरुणाचे नाव होते. तो शेडगाव जवळील सीएमपीडीआय कॅम्पमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. सूरजचा 2 सप्टेंबरला वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस असल्याने मित्र मंडळी केक घेऊन घरी जमले होते. मात्र, सूरज सायंकाळी 7 वाजतापासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला. मात्र, सूरजचा रात्र पर्यँत पत्ता लागला नाही. पुन्हा सकाळीच सूरज चा शोध घ्यायला गेले तरी सूरज दिसून आलेला नव्हता. शेतकरी रोज शेतावर पिकं पाहण्यासाठी जात असतात. यातच नेहमीप्रमाणेच सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी शेतावर जात असताना, सूरज राष्ट्रीय महामार्गावरील प्रभू दोडके यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याबाबद्द माहिती त्यांनी गावात येऊन त्याच्या कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाहनगाव चे सरपंच प्रशांत कोल्हे यांनी शेगाव पोलिसांना सकाळी 7 वाजल्यापासून सतत संपर्क साधला. मात्र, शेगाव पोलिसांकडून कसल्याही प्रकारे दाद मिळाली नाही. त्यामुळं वाहनगाव येथील नागरिकांत शेगाव पोलिसांवर संताप निर्माण केल्या जात होते.
     पोलिस येतपर्यंत तब्बल अंदाजे चार तास प्रेत झाडाला लटकतच होते. पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखरे शेगाव पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्ष सरोदे, सहाय्यक फौजदार धारणे घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले. आत्महत्तेचे कारण अजून स्पष्ट झाले नसून, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे. सहा महिन्यापूर्वीही विषारी औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा सूरजने प्रयत्न केला होता. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत.

@@@@@@@@@@@@@@@@@@

सूरज ने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आपल्याला माहिती मिळताच तात्काळ सकाळी 7 वाजल्यापासून शेगाव येथील ठाणेदार मेश्राम यांना फोन करीत होतो. मात्र शेगाव पोलिसांनी कसल्याही प्रकारे दाद दिली नाही. यामुळं तब्बल चार तास प्रेत झाडालाच लटकून राहिले. यात शेगाव पोलिसांचा बेजबाबदार दिसून आला. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रशांत कोल्हे, सरपंच ग्रामपंचायत वाहनगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!