सरस्वती विद्यालयात स्कुल बॅग, पुस्तके व नोटबुक वितरण


          
तळोधी (बा.)      
  नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, पाठ्यपुस्तके व नोटबुकांचे वितरण जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे नुकतेच करण्यात आले.                       सरस्वती विद्यालयात ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या दुस-या महामारीमध्ये अनेक पालकांना जीवन जगणे जिकीरीचे झाले. त्यात आपल्या पाल्यांना शालोपयोगी साहित्य घेऊन देणे  दुरापास्तच. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच विद्यार्थीहीत व  समाजऋण समोर ठेवून  जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे वर्ग ५ ते १० मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाठ्यपुस्तके व नोटबुकांचे वितरण करण्यात आले. या वाटपाप्रसंगी संस्थासचिव मनिषाताई बारापात्रे, सदस्य  संकेत बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, शिक्षक सुरेश बोरकर, सुरेश खोब्रागडे,चंद्रशेखर गायकवाड,मधुसूदन नागपूरे तथा सर्व  शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!