मूल शहरातील वार्ड क्रमांक ३ ( माळी मोहल्ला ) मधील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश !*
मूल :- प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
सदर बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, कालिदासजी गुरनुले ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक ३ माळी मोहल्ला येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली . सदर बैठकी मध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.
पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची वार्ड कार्यकारणी करण्यात आली.
सदर बैठकीत कालिदासजी गुरनुले, संजय मोहूर्ले, विक्की निकोडे, ढेकलुजी गुरनुले,अजय गुरनुले, बालाजी गुरनुले, आकाश गजानन निकोडे, धनराज मोहूर्ले ,गोकुल लोणबले, सौरभ मोहूर्ले, भास्कर निकोडे, दिलीप शेंडे , दिलीप जेंगठे, कृष्णा बोरूले, अजय गुरनुले, अमित गुरनुले, नितेश निकोडे, आकाश वाढई, नारायण शेंडे, ,गणेश मोहूर्ले, संजय बोरकुटे , विक्की रघुनाथ निकोडे , संदीप पोरटे आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला.
युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!
तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला भास्कर खोब्रागडे व महेश जेंगठे , शिरीष खोब्रागडे यांनी युवकांना दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!