निराधारांचा आधार म्हणजेच आमदार : राजू बाबा आवळे - डॉ.विजय गोरड
तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )
हातकणंगले : - हातकणंगले मतदारसंघात आजपर्यंत निराधारांना आधार देण्याचे जेवढे काम आमदार राजूबाबा आवळे यांनी केले आहे तेवढे काम यापूर्वी कोणत्याही आमदारांनी केलेले नाही. ते निराधारांचे खरे आधार आहेत असे गौरवोद्गार डॉ. विजय गोरड यांनी काढले.
हेरले (ता.हातकणंगले ) येथे संजय गांधी मंजूर पेन्शन पत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार राजू बाबा आवळे यांची होती.
यावेळी अतिग्रे चोकाक, माले , हेरले आणि मौजे वडगाव येथील ७६ लाभार्थ्यांना मंजूर पेन्शन पत्राचे वाटप आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मंडलाधिकारी कोरडे मॅडम,बरगाले तलाठी, जाधव तलाठी, इंगळे मॅडम तलाठी हेरले ग्रामसेवक तसेच हेरलेचे उप सरपंच सतीश काशीद, मौजे वडगावचे सरपंच काशिनाथ कांबळे, तसेच राजू कचरे, अर्जुन पाटील, राहुल शेटे, विद्या चव्हाण, महंमद जमादार, इम्रान पटेल, जावेद हजारी, भगवान कांबळे, कृष्णात सावंत, बशीर हजारी, संजय जंगम बी चॅनेलचे प्रतिनिधी अनिल उपाध्ये यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन हसीम मुलांनी यांनी केले तर आभार रियाज जमादार यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!