एकीकळे गाजावाजा तर दुसरीकडे तोबातोबा राजुरा

तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - एकीकळे गाजावाजा तर दुसरीकडे तोबातोबा राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या मंगी( बु ) ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या खैरगुडा गावातील रस्त्याची दयनीय अवस्था  खैरगुडा हे गावमागील  दहा  वर्षापासुन हागणदारीमुक्त मुक्त  असुन गाव विकास समितीच्या माध्यमातुन ग्राम विकासासाठी वार्षिक गावातुन निधी काढुन गावातील लहान मोठे काम केले जाते गावाकळे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असुन गावात ग्रामपंचायत माध्यमातुन कुटल्याही प्रकारचा विकास होत नाही आहे. गावात चांगले रस्ते नसुन बनवलेला रस्ता  पाच वर्षात फुटला आहे पाणीपुरवठा योजना नावापुरती असुन नळाचे पाणी पंधरा दिवस  सुरु तर एक महिना बंद अशी वास्तव परिस्थिती आहे नळ योजनेला मीटर नसुन गावकऱ्यांकळुन कर आकारला जातो तर गावकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे की शासनाकळुन येणारा निधी कुटे जातो असा प्रश्ण  गावकऱ्यांना पडलेला आहे डेंगु मलेरीया सारख्या रोगापासुन मुक्तता यासाठी मच्छर फवारणीसाठी  ग्रामसेवक यांना मागील आठ दिवसापासुन  सांगून सुध्दा फवारणी करण्यात आली नाही. असा ग्रामवाशीयांनि आरोप केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!