अस्वल हल्यात मणुष्य जखमी
बल्लारपूर (वसंत मुन)
श्री. महादेव काशीनाथ बोबाटे रा. मानोरा (वय 43 वर्ष) तह. बल्लारशाह जि. चंद्रपुर हे वनात बकऱ्या चराई करण्याकरीता गेले असता. त्यांचेवर अस्वल वन्यप्राण्याने हल्ला केल्यामुळे जखमी झाले.
सदर घटना वनविभागाचे परिक्षेत्र बल्लारशाह, उपक्षेत्र मानोरा, नियक्षेत्र मानोरा-2 मधील कक्ष क्र. 450 मध्ये घडलेली असुन सदर परिसरात श्री. डी. एस. बावणे, क्षेत्र सहाय्यक मानोरा, व कु. आर. ए. मुन वनरक्षक यांना गस्ती दरम्यान माहिती मिळाली असता घटनास्थळी तात्काळ जाऊन पाहणी करुन खाजगी वाहनाव्दारे प्राथमिक उपचाराकीरता ग्रामिण रुग्नालय बल्लारशाह येथे दाखल केले. तिथुन जिल्हा सामान्य रुग्नालय चंद्रपुर येथे भरती करण्यात आले. ज व्यक्तीस वनविभागामार्फत 10 हजार रुपये तात्काळ आर्थिक सहाय्य देण्यात आले. सदर परिसरात वनविभागामार्फत गस्ती व सनिंतत्रनाची कार्यवाही असुन कोणीही वनामध्ये जानार नाही याकरीता मनाई करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!