गांजा शेती करण्याची मागितलेली परवानगी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे

तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )

हातकणंगले : - दोन एकर गांजा शेती लावण्यास परवानगी मिळावी असे एक शेतकरी अनिल आबाजी पाटील रा शीरापुर ता मोहळ यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत गट नंबर १८१/४ असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
     मी शेतकरी असून कोणतेही पीक केले तरी त्याला शासनाचा हमीभाव नसल्याने शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतमालाला काडी मोल भाव मिळत असल्याने शेती तोट्यात जात आहे मशागतीला केलेला खर्च देखील मिळत नाही तसेच एखाद्या कारखान्याला ऊस घातला तरी त्याचे बिल देखील लवकर मिळत नाही त्यामुळे कांद्याला भाव चांगला असल्याने गांजा शेती करण्यास परवानगी मिळावी.
      मला माझ्या वर नमूद केलेल्या गटामध्ये दोन एकर गांजा शेती करण्यास दि १५/०९/२०२१ पर्यंत लेखी परवानगी घ्यावी अन्यथा मी दि.१६/०९/२०२१ या दिवशी प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असे या पत्राद्वारे त्यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!