राजारामबापू कारखान्याच्या ऊस उत्पादकांना प्रति मेट्रिक टनास ११० रूपये मिळणार

तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )

हातकणंगले : - राजारामबापू कारखान्याच्या ऊस उत्पादकांना प्रति मेट्रिक टनास ११० रूपये प्रमाणे मिळणार ऊस उत्पादकांच्या खात्यात २० कोटी ४० लाख रुपये १ सप्टेंबरला वर्ग करणार अध्यक्ष पी. आर. पाटील इस्लामपूर राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याच्या साखराळे युनिट नंबर १ , वाटेगाव-सुरुल युनिट नंबर २ व कारंदवाडी युनिट नंबर ३ कडील सन २०२०-२१ मध्ये गळीत हंगामातील ऊसास प्रति मेट्रिक टनास ११० रूपये प्रमाणे २० कोटी ४० लाख रुपये १ सप्टेंबर रोजी संबंधीत ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक श्रेणिक कबाडे, विराज शिंदे, दिलीप पाटील, एल. बी. माळी, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चिफ अकौंटंट अमोल पाटील उपस्थित होते. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिट नंबर १ कडे ९ लाख ४७ हजार ९८ मेट्रिक टन वाटेगाव-सुरुल युनिट नंबर २ कडे ५ लाख २३ हजार ९५७ मेट्रिक टन तसेच कारंदवाडी युनिट नंबर ३ कडे ३ लाख ८३ हजार ६५३ मेट्रिक टन असे एकूण १८ लाख ५४ हजार ७०८ मेट्रिक टनाचे गाळप झाले आहे. ऊस उत्पादकांना गणपतीच्या सणासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अंतिम हप्ता आँक्टोंबर महिन्यात दिपावलीच्या अगोदर देण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल चालू आहे. चारही युनिटकडील आँफ सिझनची कामे अंतिम टप्यात आली असून वेळेत पुर्ण करुन सन २०२१- २२ चा गळीत हंगाम १५ आँक्टोंबर २०२१ च्या दरम्यान चालू करण्यात येणार असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी आपण पिकविलेला ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे. कोरोना महामारीचे सर्व नियमांचे पालन करुन सर्वानी काळजी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!