राष्ट्रवादी काँग्रेस ची प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न
मूल :- प्रतिनिधी
बुधवारला शासकीय विश्रामगृह मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांच्या सूचनेनुसार मूल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची प्रमुख पद धिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांचे नेतृत्वात पार पडली.
सदर बैठकीत प्रामुख्याने नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक संबंधित विषयावर पार पडली.
येणाऱ्या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी निवडणूक लढू असा ठाम विश्वास व येणाऱ्या मंत्री महोदयांची दौराबाबत सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी उपस्थित प्रमुख पदधीकारी ह्यांना दिला.
ह्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गंगाधर कुणघाडकर, रयत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी, समता परिषद चे जिल्हाध्यक्ष विजय लोणबैले , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, युवक तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार ह्यांनी सुद्धा उपस्थित प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या विषयाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पदाधिकारी मध्ये उपस्थितीत जेष्ठ नेते किसनराव वासाडे , कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर महिला तालुकाध्यक्ष निताताई गेडाम , हेमंत सुपणार , महेश जेंगठे नंदू बारस्कर,दुर्वास घोंगडे ,ममता गोजे, सोनल मडावी, अजय त्रीपतीवार,विकास गेडाम ,मारोती शेंडे , प्रा. हरीश रायपुरे, प्रशांत भरतकर , नवनीत चिंचोलकर , विकास रणदिवे,पुनेश्वर गेडाम , प्रभाकर धोटे, विक्रांत मोहूर्ले ,विपुल ठिकरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!