जि.प.सदस्य श्री.रमाकांत लोधे आयोजित शिबिरातील रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता रवानगी
जि.प.सदस्य श्री.रमाकांत लोधे आयोजित शिबिरातील रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता रवानगी
कोरोना काळातही श्री. रमाकांत लोधे यांची मोतीबिंदू उच्चाटन चळवळीची परंपरा कायम
नवरगाव (शांताराम आदे)
कोरोना नावाचे महासंकट जगभरात आले आणि त्याचे दूरगामी विपरीत परिणाम सर्व क्षेत्रावर झाले. शासनाने टाळेबंदी घोषित केल्याने सर्व सार्वजनीक कार्यक्रम बंद झाले. मागील १५ वर्ष्यापासून सातत्याने मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करीत तालुक्यातील मोतीबिंदू उच्चाटनाची लोकचळवळ हाती घेणारे श्री.रमाकांत लोधे यांच्या शिबीर आयोजनाला मागील 2 वर्षी पासून मर्यादा आली.परंतु या काळात तालुक्यात मोतिबिंदू रुग्णांची संख्या मोठ्या वाढली म्हणून जि.प.सदस्य श्री.रमाकांत लोधे यांनी लायन्स क्लब,चंद्रपूर आणि सेवाग्राम नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ व प्रशासनाशी गावस्तरावर शिबीराचे आयोजन करण्यासंदर्भात चर्चा केली, सर्व शासन नियम पाळून शिबिर आयोजनाला परवानगी मिळवून स्वगाव रत्नापुर येथे शिबीर घेऊन ७४ रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता निवड करण्यात आली.
सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम ,लायन्स क्लब चंद्रपूर आणि जि. प.सदस्य श्री.रमाकांत लोधे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले . यामध्ये सेवाग्राम नेत्र रुग्णालय येथील डॉ.अझहर ,डॉ.गौरव आणि नेत्र सहाय्यक श्री.कार्डेकर तसेच ग्रामीण रुग्णालय,सिंदेवाही येथील नेत्र सहाय्यक श्री. दुधे व सेवानिवृत्त नेत्र चिकित्सक श्री.जाधव यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली आणि निवडलेल्या ७४ रुग्णांना
शस्त्रक्रियेकरीता सेवाग्राम नेत्र रुग्णालय सेवाग्राम येथे रवानगी करण्यात आली.
कोरोना काळात असंख्य मोतीबिंदू रुग्ण दृष्टीजाण्याच्या भीतीने त्रस्त झाले होते अशा संक्रमन काळात गावस्तरीय शिबीरांचे आयोजन करून जिल्ह्याभरात मोतीबिंदू आणि रक्तदान चळवळीसाठी नावलौकिक असणारे जि.प.सदस्य श्री. रमाकांत लोधे यांनी नक्कीच त्या वृद्ध मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीची संजीवनी दिली आहे.
सदर शिबिराच्या आयोजन आणि यशस्वीतेकरिता जि.प सदस्य श्री. रमाकांत लोधे यांच्या सोबतीने ग्रा.प. सदस्य श्री. मंगेश मेश्राम ,श्री.वामन जीवतोडे ,ग्रा प. सदस्य श्री.वासुदेव दडमल,श्री. कपिल मेश्राम, शिक्षक श्री.गायकवाड सर, टिकेश कुंभरे, आशिष पात्रे, आशिष नागोसे, सुरज कुंभरे,वैभव चनफने,सचिन ढोणे यांनी विशेष मेहनत घेतली .
अशी गावस्तरावरील शिबिरे पूर्ण तालुकाभर आयोजित करून मोतीबिंदू उच्चाटनाची चळवळ कायम राबविल्या जाहील असा मानस श्री. रमाकांत लोधे यांनी व्यक्त केला आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!