भाजप च्या तालुका अध्यक्षाचा काँग्रेस पक्षात प्रवेश
नाना पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन घेतली दमदार एन्ट्री
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दि.१५/०७/२०२१ महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये धनराज मुंगले यांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.हे भारतीय जनता पार्टी चे एकमेव असे दमदार तळफदार असे नेतृत्व करणारे तालुका अध्यक्ष होते.त्यानंतर त्यांनी माजी तालुका अध्यक्षाची भूमिका सुद्धा योग्यरित्या पार पाडली २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेद्वारी चा पाया रचत नामांकन दाखल केले होते.समाजामध्ये त्यांची सर्वांत आगळी - वेगळी भूमिका होती.असे ते संजकारणी आणि राजकारणी स्वभावाचे आहे.हिच जाणीव नेहमी जनतेमध्ये टिकून राहावी याकरिता महाविकास आघाडी च्या सरकारास जोमून काम करण्याची भूमिका पार पाडता यावी व जनतेची सेवा करण्याची आवड कायमस्वरूपी राहावी म्हणून काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते यशवंतजी वाघे माजी सरपंच नेरी, विठ्ठल पाटील कोरेकर खडसंगी, नाना नंदनवार शिवसेना शहर प्रमुख, अनंताजी येळणे शंकरपुर, प्रदीपजी तळवेकर चिमूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!