माझी पोषण परसबाग मोहीम



मुल (अमित राऊत) 
चिमढा तालुका मुल येथे माझी पोषण परसबाग अंतर्गत ग्रामपंचायत चिमढा येथे पोषण परसबाग तयार करण्यात आली.
मुल तालुक्यात चिमढा येथे नागरिकांना अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून माझी पोषण परसबाग अभियान राबविण्यात येत आहे. कोविड परिस्थितीत ताजा भाजीपाला तुटवडा दूर करणे व जोखीम प्रवण व्यक्ती व कुटुंबाच्या अन्नसुरक्षेचा आणि पोषण सुरक्षेच्या प्रश्न निकाली निघण्यास यामुळे मदत होणार असून कुपोषणमुक्तीसाठी हातभार लागणार आहे. सदर पोषण परसबाग मध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला,फळभाज्या, औषधी वनस्पती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक माया सुमटकर यांनी दिली आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील व्यवहारावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागामध्ये पोषण आहाराचा प्रश्न बिकट झाला आहे. रासायनिक खताच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो. त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात त्यावर पर्याय शोधून ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांना आहारामध्ये पोषकद्रव्ये मिळावी व कमी खर्चामध्ये पोषक सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या व औषधी वनस्पती त्यांच्या गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उमेदच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता समूहाच्या मार्फत माझी पोषण परसबाग तयार करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमासाठी मा. कालीदास जयराम खोब्रागडे सरपंच ग्रामपंचायत चिमढा, मा. लेनगुरे उपसरपंच ग्रामपंचायत चिमढा, मा. जिवनकला रुपचंद लेनगुरे अध्यक्षा समता महिला ग्रामसंघ चिमठा, मा. प्रकाश तुराणकर तालुका व्यवस्थापक, निलेश जीवनकर, मा. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, मा.अमर रंगारी प्रभाग समन्वयक, भावना कुमरे प्रभाग संघ व्यवस्थापक,  मयूर गड्डमवार कृषी व्यवस्थापक, मा.स्नेहल मडावी तालुका समन्वयक, कृतीसंगम सखी गीता चलाख , पौर्णिमा खोब्रागडे, दीक्षा मोहूर्ले, कविता सुरमवार, समुदाय संसाधन व्यक्ती वर्षा बल्लावार, कविता गंगासागर, सीमा लाडवे,उषा बारेकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!