माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांचा नागभीड येथे सत्कार..

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यपदी निवड; ढिवर-भोई-केवट  समाज सेवा संघ तालुका शाखा नागभीड च्या वतीने आयोजन..!!


नागभीड..
        महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल माजी न्यायमूर्ती तथा ढिवर-भोई-केवट समाजाचे नेतृत्व करणारे मान.चंद्रालाल मेश्राम यांचा नागभीड येथे रुख्मिणी सभागृहात ढिवर-भोई-केवट  समाज सेवा संघ तालुका शाखा नागभीड व वाल्मिकी पुरुष बचत गट नागभीड च्या वतीने शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.. माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांनी या आधी राज्यात महत्वाच्या पदावरून कामगिरी केलेली असून ढिवर-भोई-केवट या समाजातील अनेक वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आजतागायत त्यांनी लढा दिलेला आहे.. या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाशजी डायरे, जिल्हा मच्छिमार संघाचे संचालक विजयजी नान्हे, अध्यक्ष स्थानी ढिवर-भोई-केवट  समाज सेवा संघ तालुका शाखा नागभीड  चे अध्यक्ष गुलाबरावजी भानारकर, प्रमुख उपस्थिती मध्ये नागोजी भानारकर, नागोरावजी नान्हे, होमदेवजी मेश्राम,वाल्मिकी बचत गटाचे अध्यक्ष निलकंठराव चांदेकर यांची उपस्थिती होती..
   यावेळी नागोजी भानारकर, नागोरावजी नान्हे,निलकंठजी चांदेकर यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य पदी निवड झाल्याबद्दल चंद्रालाल मेश्राम यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तर प्रकाश डायरे यांनी ढिवर समाजातील एका अभ्यासू व्यक्तीची या पदावर निवड केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले व राज्य मागास वर्ग आयोग म्हणजे नेमकं काय याची माहिती दिली तर सत्काराला उत्तर देताना राज्य मागास वर्ग आयोग सदस्य चंद्रालाल मेश्राम यांनी या पदावरून काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आपण उत्तम प्रकारे कार्य करू केले तसेच आयोगाच्या वतीने जि जबाबदारी दिलेली आहे तिला योग्य रित्या पार पाडू असे प्रतीत केले व या सत्कार सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले..!!
   यावेळी दयाराम नान्हे,प्रकाश भानारकर, दिलीप भानारकर, प्रफुल्ल भानारकर, विलास दिघोरे,दिनकर डोंगरवार,हिवराज दिघोरे,अजय दिघोरे,सुनील मांढरे, व गंगोत्री महिला बचत गटाच्या सदस्या यांची उपस्थिती होती..!!
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले तर प्रास्ताविक गिरीशजी नगरे  यांनी केले तर आभार शांताराम नागापुरे यांनी मांनले..!!!
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!