संबंधित वनविभागाने धामणगाव चक येथील वाघाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला धनादेश देताना तेथील सरपंच अमोल बावनकर यांना डावलले



'पिडीत परिवाराला घरी धनादेश न देता, आमदारांचे स्वतः श्रेय डावलन्याकरीता वन कार्यालयात धनादेशाचे वाटप.'

एक वर्षासाठी निलंबित झालेल्या आमदाराच्या हस्ते
धनादेशाचे वाटप.
      - येनुली माल येथील सरपंच अमोल भाऊ बावनकर यांचे आरोप.
तळोधी (बा.)

            तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील, ग्राम पंचायत येणोली माल अंतर्गत येणाऱ्या धामणगाव चक येथील एका गरीब महिलेवर काही दिवसांपूर्वी वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला वनविभागाच्या वतीने 4 लाख 80 हजार रु चेक तळोधी बा. वनपरिक्षेत्र येथे आज वाटप करण्यात आला आहे. मात्र सदर चेक हा मृत्यू कुटुंबाच्या घरी वनविभागाच्या वतीने नेऊन देणे अनिवार्य असताना वनविभाग आपल्या स्वमर्जीने व परस्पर रित्या आज स्थानीक  निलंबित आमदार यांच्या हस्ते तळोधी बा. येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात धनादेशाचे वाटप करण्यात आले. 
            मात्र सदर धनादेश वाटप करतांना गावातील प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच श्री अमोल बावनकार यांना हेतूपूर्वक वनविभागाच्या अधिकारी वर्गानी डावलले आहे. मात्र एक वर्षासाठी निलंबित असलेल्या आमदार च्या हस्ते मृत्यू कुटुंबातील व्यक्तीला धनादेश देण्यात आला आहे. हे मात्र विशेष आहे.  मात्र जंगल परिसरातील गावांमध्ये  वनविभागाच्या व गावकऱ्यांचात कोणतेही तनावाचे वातावरण निर्माण झाले की सरपंच यांच्या सहकार्याची अपेक्षा असलेल्या वनविभागाच्या या दुटप्पी कारभाराची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कारवाही करण्याची मागणी सुद्धा सरपंच अमोल बवनकार यांनी केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी न झाल्यास वनविभागाच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा मानस असल्याचे सरपंच अमोल बावनकार असे मत यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांच्या जवळ  व्यक्त केले आहे.
            "कोरोना महामारीच्या परिस्थितीत गावात जाऊन धनादेशाचे वाटप योग्य नसल्याने आफिस मध्ये बोलवून पिडित परिवाराला धनादेश देण्यात आले. आणि आमदाराची उपस्थितीची आम्हाला पुर्व सुचना नव्हती."- श्री के.आर. धोंडने, वनपरिक्षेत्र अधिकारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!