डॉ.एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न..



शंकरपूर.. 
येथून जवळच असलेल्या आंबोली गावात पोलीस प्रशासनाच्या मदतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन नितीन बगाटे ips चिमूर यांच्या हस्ते करण्यात  आले .
यावेळी प्रमुख उपस्थिती विनोद जांभळे सपोनि शंकरपूर , नितीन गभने पोलीस निरीक्षक भिसी व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोद गौरकर , युवराज मुरस्कर व आंबोली ग्राम पंचायतच्या सरपंच शालिनी डोहतरे ,उपसरपंच वैभव ठाकरे , ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे ,केशव गजभे,रंजू सवाईकर , मनीषा चौधरी , प्रियांका नागोसे , कुंदा बारेकर , व विध्यार्थी, गावातील नागरिक उपस्तीत होते. यावेळी संचालन उपसरपंच वैभव ठाकरे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम मंडपे ग्राम पंचायत सदस्य आंबोली यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक लाकडे यांनी केले या अभ्यासिकेसाठी ips नितीन बगाटे चिमुर व पोलीस स्टेशन भिसी चे ठाणेदार नितीन गभने  Api विनोद जांभळे शंकरपूर व Api टिकाराम थाटकर, औतकर राउंड ऑफिसर भिसी , प्रवीण गराटे तलाठी आंबोली , कपिल खडतकर आरोग्य उपकेंद्र आंबोली यांच्या माध्यमातून मदत करण्यात आली   या अभ्यासिकेच्या उद्घाटनाच्या निमित्याने पिंपलवृक्षाचे वृक्षारोपण ips नितीन बगाटे व  नितीन गभने ठाणेदार भिसी व सपोनि विनोद जांभळे यांनी केले या अभ्यासिकेत चिंचाळा, लावारी, वाकरला , व परिसरातील विध्यार्थी अभ्यासिकेत अभ्यास करायला येणार आहेत..
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी नागेश बारेकर यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेल्या वृद्ध महिलेचा जीव वाचवला होता, तसेच स्वप्नील वाकडे यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला गावातील गॅस सिलेंडर ला आग लागली असता त्यांनी ती विझवली होती हा कार्यक्रम यशस्वी साठी शरद वांढरे , दीपक लाडके मेघा जांभळे, अश्विनी जांभळे, पूजा वांढरे,भारती जांभळे,करिष्मा वाकडे, रुपाली वाकडे, सुरेश वांढरे, सोनू वांढरे व गावातील नागरीकांनी परिश्रम घेतले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!