निष्क्रिय जिल्हा प्रमुखाचे क्षेत्रात पक्ष संघटन वाढणार का ? केवलसिंग जुनी शिवसेना उप तालूका प्रमुख चिमुर यांचा आरोप

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - उद्भवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पक्ष बांधणीसाठी १२ जुलै ते २४ जुलै पर्यंत विशेष कार्यक्रम राबवून गाव तेथे शाखा आणि गावा - गावात शिवसैनिक जोडण्याचे आदेश वजा सूचना राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत त्यांनी शिवसैनिकांच्या पाठीशी पक्ष उभा आहे असेही सांगितले हे त्यांचे शिवसैनिकांवरील प्रेम आहे. त्यामुळेच अनेक निष्ठावान शिवसैनिक जिल्हा प्रमुखाकडून वारंवार अपमानित होऊनही पक्षात आहेत ते केवळ शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेमापोटी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे गाव आहे स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात पक्ष वाढवीण्याचे काम जिल्हा प्रमुख करीत आहे.पण चिमूर व ब्रह्मपुरी या  दोन विधानसभा क्षेत्राचा जिल्हाप्रमुख पुर्ण पणे दुर्लक्ष करीत आहे.जर असा प्रकार या विधान सभा क्षेत्रात दिसत असेल आणि काम होत नसेल तर या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे संघटन कसे वाढणार असा प्रश्न उपस्थित होतो. या जिल्हाप्रमुखाने चिमूर व ब्रह्मपुरी या दोन्ही विधानसभा क्षेत्राकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत केवळ स्वतःचे पद टिकवण्यासाठी गटबाजीला प्रोत्साहन दिले आहे. या विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन करण्यासाठी जिल्हाप्रमुखाने कधीही तालुकानिहाय बैठका घेतल्याचे आठवत नाही. संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा दौरा करून कुठे-कुठे शाखा आहेत? कागदावर दिलेल्या शाखा आहेत का? शाखा प्रमुख आहेत का? याची कधीतरी खात्री करण्यात आली का? चार-सहा महिन्यातून एखाद्या तालुक्याला धावती भेट द्यायची मर्जीतील लोकांना बोलवायचे आणि निघून जायचे हा कार्यक्रम जिल्हाप्रमुखाचा असतो. त्यामुळे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राकरिता स्वतंत्र जिल्हा प्रमुख देण्यात यावा अशी मागणी निष्ठावान शिवसैनिकांकडून पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचेकडे केली जात आहे.
१२ जुलै ते २४ जुलै २०२१ या काळात विशेष कार्यक्रम राबवून पक्ष संघटन करणे व राज्य सरकारचे शेतकरी, सर्व सामान्य जनता यांच्या हिताकरिता घेतलेले निर्णय गावागावात पोहचविण्याचे काम करून गाव तेथे शाखा निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी या माध्यमातून करून पक्ष संघटन करावे असा आदेश पक्ष प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन दिले. याबाबतची माहिती जिल्हाप्रमुखाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्याना मिळणे आवश्यक होते. मात्र जिल्हाप्रमुखाने आजी माजी पदाधिकारी यांनी वगळून स्वमर्जीतील निवडक लोकांना बोलावून याची माहिती दिली.
         चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जिल्हा प्रमुखाच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळे पक्ष संघटन मोडकळीस आले आहे. चिमूर,  ब्रह्मपुरी,  या ठिकाणी गेल्या दोन  वर्षांपासून तालुका प्रमुख नाही तर सावली येथे पक्षाचे कोणतेही संघटन नाही. जिल्हाप्रमुखाने याकडे कधीही लक्ष दिले नाही.
ब्रह्मपुरी तालुक्यात ज्यांनी आपली पूर्ण हयात पक्षात घालविली अशा निष्ठावान शिवसैनिकांना वगळून ज्यांनी वारंवार पक्ष सोडले आहे, जे दोन पक्षाच्या बांधावर उभे आहेत अशा आयाराम-गयाराम जिल्हाप्रमुखाने जवळ करीत तालुक्यातील पक्ष संघटन गटबाजीत टाकले आहे.
 गेल्या १० ते १५ वर्षांपासून आजपर्यंतच्या जिल्हा प्रमुखांनी चिमूर आणि ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्राच्या पक्ष बांधनिकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत केवळ गटबाजीला प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे या दोन्ही विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे पक्षसंघटन विस्कळीत झाले आहे. आज आमची शाखा कुठेही नाही अशी काहीशी अवस्था या दोन्ही क्षेत्रात झाली आहे ज्या काही शाखा आहेत त्या कडवट शिवसैनिकांनी जपून ठेवल्या आहेत मात्र त्यांना काळीचीही किंमत नाही आयाराम गयाराम यांना किंमत देत त्यांची वर्णी जिल्हाप्रमुखाचे शिफारशीनुसार  समित्यांवर लावल्याची तक्रार केली जाते मात्र, त्याकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेस चे आहेत त्यामुळे सर्वच समित्यांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. आघाडीतील शिवसेना आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना फारशे स्थान नाही. याबाबत जिल्हा प्रमुख व संपर्कप्रमुख काहीही बोलताना दिसत नाही. 
   सत्ता असतांना कार्यकर्त्याना कोणत्याही समितीवर काम करण्याची संधी मिळत नाही. मात्र, त्यांनी जनतेची कामे केवळ शिवसैनिक म्हणून करावे हे वरिष्ठांचे नेहमीच आदेश असतात. शिवसेना सत्तेत असो अथवा नसो जनतेची कामे करीत रहा ही शिकवण साहेबांची आहे. परंतु कार्यकर्ता हा देखील एक माणूस आहे त्यांच्या पण अपेक्षा असतात की आता आपण सत्तेत आहोत त्यामुळे कोणत्यातरी शासकीय समितीवर काम करायची संधी मिळेल त्यामुळे मला माझ्या तालुक्यात, गटात, गावातील जनतेची कामे करणे सोयीचे होईल मात्र असे होत नाही. 
        ब्रह्मपुरी व चिमूर हे दोन्ही विधानसभा क्षेत्र उद्योग विरहित जिल्हे आहेत. पक्ष संघटन करायचा म्हटलं तर त्याला निधीची गरज असते मात्र येथे ते शक्य नाही. कंत्राटदार, अधिकारी  यांच्याकडून थोडीफार निधी मिळाली तर  ती देखील जिल्हाप्रमुखाने कधी वरोरा तर कधी चंद्रपूर येथे ठेवलेल्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी प्रवासावर खर्च करण्यात जातात. निधी मिळाली नाही तर पदाधिकाऱ्याला स्वतः जवळून खर्च करण्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेच्या विचाराशी जुडलेले कार्यकर्ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पक्ष संघटन उभे होताना दिसत नाही. वास्तविकता जिल्हाप्रमुखाने त्याच्याकडील विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन करून पक्ष संघटन करण्याबाबत मार्गदर्शन करीत त्या त्या तालुक्यातील गावाना भेटी दिल्या पाहिजे, व तालुका प्रमुख खरोखरच पक्ष बांधणी करतो की नाही याची त्यांनी खात्री केली पाहिजे मात्र, असे होत नाही केवळ कागदी घोडे नाचविले जातात. शाखा, शाखा प्रमुख , गट प्रमुख, बूथ प्रमुख,  विभाग प्रमुख हे केवळ कागदावर असतात. त्यामुळे जिल्हाप्रमुखा मार्फत, जिल्हा संपर्क प्रमुखास त्यांचे मार्फत पूर्व विदर्भ समन्वयक  त्यांचेकडून पक्षप्रमुख अशी पक्ष संघटनेची माहिती पुरविली जाते. ती खरी की खोटी हे केवळ स्थानिक पदाधिकारी यांनाच माहीत असते. मात्र याबाबत पत्र व्यवहार करून स्थानिक पदाधिकारी किंवा शिवसैनिकांनी  वरिष्ठांना माहिती दिली तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे कुठे तरी थांबले तरच पक्ष संघटन होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!