जागतिक लोकंसख्या दिन एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात आभासी पध्दतीने साजरा
प्रतिनिधी:- कुमुद भोयर मूल
फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ. ई .एस . गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग व अर्थशास्त्र विभागा द्वारा आभासी पध्दतीने जागतिक लोकंसख्या दिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जागतिक लोकंसख्या दिन या कार्यकमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. विद्या जुमडे तर प्रमुख अतिथि तथा मागदर्शक प्रा.डा. राजेश चीमनकर व कार्यकमाचे दुसरे मागदर्शक प्रा.योगेश निमगडे हे होते.
प्रभारी प्राचार्य डॉ विद्या जुमडे यांनी
देशाचा विकास करायाचा असेल तर देशात कार्यक्षम व्यक्ति ची गरज आहे पण देशात लोकसंख्या सतत वाढत राहिल्यास देशाला अनेक समस्याना सामना करावा लागेल अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. तर प्रा.डाॅ .राजेश चीमनकर यांनी विविध देशाचे लोकसंख्ये बाबत माहिती दिली तसेच चिन हा देश लोकंसख्ये बाबतीत कमांक १ वर आहे परंतु या देशात वृद्धाचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे या देशानी तिसरे मूल जन्म देण्यास परवानगी दिली आहे पुढे हा प्रंसग आपल्यावर सुध्दा येवू शकते असा विचार कार्यक्रम प्रंसगी व्यक्त केले. प्रा. योगेश निमगडे यानी कोरोनाचे उदाहरण देऊन लोकसंख्यावाढी च्या कारणाचा व परीणाची जाणीव करुण दिली. कार्यक्रम चे आयोजन , सुत्र संचालन व आभार रासेयो विभाग प्रमुख प्रा.डाॅ. राजेंद्र बारसागडे यांनी केले.जागतिक लोकंसख्या दिन आभासी पध्दतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व मोठयासंखयेनी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!